बेफाम कारने महिलेला चिरडले, दुचाकीस्वाराला धडक देऊन उलटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:02 PM2023-08-14T12:02:13+5:302023-08-14T12:03:41+5:30

रामनगर चौकात थरार, चालक फरार, तणाव अन् वाहतूक कोंडी

The reckless car crushed the woman, hit the bike rider and overturned | बेफाम कारने महिलेला चिरडले, दुचाकीस्वाराला धडक देऊन उलटली

बेफाम कारने महिलेला चिरडले, दुचाकीस्वाराला धडक देऊन उलटली

googlenewsNext

नागपूर : रामनगर चौकात एका अनियंत्रित कारने एका पादचारी महिलेला अक्षरश: चिरडले. तर कारचालकाने एका दुचाकीलादेखील धडक दिली व त्यात तरुण जखमी झाला. कार अतिवेगात असल्याने चौकात उलटली व त्यानंतर चालक फरार झाला. या प्रकारामुळे रामनगर चौकात तणाव निर्माण झाला होता. बराच वेळ वाहतुकीचीदेखील कोंडी झाली होती.

रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. एम.एच. ३१, सी.पी. ५३२२ ही पजेरो कार वेगाने रामनगर चौकात आली. चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले व कारने अगोदर पावन चौरसिया (३३, हिलटॉप) यांच्या दुचाकीला धडक दिली. घरातून दैनंदिन वस्तू विकत घेण्यासाठी बाहेर निघालेले पवन यात जखमी झाले. त्यानंतरही कारचा वेग कमी झाला नाही व एका पादचारी महिलेला धडक दिली. त्यानंतर गाडी चौकातच उलटली. चालक तेथून फरार झाला.

महिलेला लगेच उपचारासाठी मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी पवनवर रविनगरातील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अंबाझरी पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: The reckless car crushed the woman, hit the bike rider and overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.