मजबुरीचा फायदा अन् वासनेचा बाजार! पांचपावलीत कुरेशी दाम्पत्याचा 'गलिच्छ' कारभार पोलिसांनी उधळला; वाचा थरारक कारवाई.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:39 IST2026-02-10T19:38:39+5:302026-02-10T19:39:18+5:30
Nagpur : पती-पत्नीच चालवायचे देहविक्रीचा काळा धंदा; गुन्हे शाखेचा धाडसी छापा, दोन महिलांची नरकातून सुटका

The profit of coercion and the market of lust! The police foiled the 'dirty' business of the Qureshi couple in Panchpavali; Read the thrilling action.
नागपूर : समाजात पती-पत्नीच्या नात्याला विश्वासाचा आणि पावित्र्याचा आधार मानले जाते, मात्र याच नात्याचा ढाल म्हणून वापर करत महिलांच्या अगतिकतेचा व्यापार करणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी थरारक पर्दाफाश केला आहे. शहरात सक्रिय असलेल्या 'अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने' (AHTU) एका अत्यंत धाडसी कारवाईत दोन पीडित महिलांना नरकयातनेतून बाहेर काढले असून, देहविक्रीचा हा काळा धंदा चालवणाऱ्या पती-पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.
बोगस ग्राहक अन् पोलिसांचा 'शार्प' सापळा!
पांचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील नगर परिसरात एका घराच्या आडून देहविक्रीचे रॅकेट चालत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली. आरोपींना संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी स्वतः 'बोगस ग्राहक' बनून या जोडप्याशी संपर्क साधला. दोन महिलांचा सौदा ठरला आणि आरोपींना वाटले की आज मोठी 'कमाई' होईल; पण तिथे साक्षात खाकी त्यांची वाट पाहत होती.
राणी दुर्गावती चौकात हाय-व्होल्टेज ड्रामा!
सौदा पक्का झाल्यानंतर आरोपी पती-पत्नी दोन्ही महिलांना ग्राहकाकडे पोहोचवण्यासाठी निघाले. मात्र, ते राणी दुर्गावती चौक ओलांडण्यापूर्वीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. भर चौकात अचानक झालेल्या या कारवाईमुळे आरोपींची पळताभुई थोडी झाली. तपासादरम्यान समोर आले की, या महिलांना आर्थिक अडचणीत असल्याचा गैरफायदा घेऊन आणि पैशांचे आमिष दाखवून या दलदलीत ओढले गेले होते.
कोण आहेत हे 'क्राईम पार्टनर'?
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तौफिक नियाज कुरेशी आणि जोया तौफिक कुरेशी अशी आहेत. तपासातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे, जोया हिचा हा दुसरा विवाह होता. दोन वर्षांपूर्वी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यावर तिने तौफिकशी विवाह केला. सुखाचा संसार करण्याऐवजी या दाम्पत्याने गुन्हेगारीचा रस्ता धरला आणि असहाय्य महिलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली.
'पीटा' कायद्यान्वये गुन्हा दाखल; तपासाचा फास आवळला
पाचपावली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर 'अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा' (PITA) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुटका केलेल्या महिलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली असून, या रॅकेटचे जाळे शहरात आणखी कुठे पसरले आहे का? आणि याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? याचा कसून तपास आता पोलीस करत आहेत.