शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता मुलींचं गूढ ! आकडे धक्कादायक, पण वास्तव चकित करणारं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:10 IST

Nagpur : गृहविभागाच्या २०२४-२५ च्या आकडेवारीनुसार वर्षभरात राज्याच्या विविध भागांतून ४८ हजार २७८ महिला तसेच मुली बेपत्ता झाल्या. त्यातील ३६ हजार ५८१ महिलांचा ठावठिकाणा लागला.

नागपूर : गृहविभागाच्या २०२४-२५ च्या आकडेवारीनुसार वर्षभरात राज्याच्या विविध भागांतून ४८ हजार २७८ महिला तसेच मुली बेपत्ता झाल्या. त्यातील ३६ हजार ५८१ महिलांचा ठावठिकाणा लागला. मात्र तब्बल ११ हजार ६९७ महिलांचे पुढे काय झाले, हा प्रश्न कायम आहे. याला निमित्त ठरले आहे कळंब तालुक्यातील तासलोट जंगलातील तरुणीच्या खूनप्रकरणाचे.

तासलोट येथील जंगलामध्ये दि. १५ मार्च रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळून आला. तिची ओळख पटणार नाही, याची पुरेपूर खबरदारी आरोपीने घेतली होती. त्यामुळे या गुन्ह्याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून या खुनाच्या घटनेचा छडा लावला. मात्र, हा तपास करताना सुरुवातीला पोलिसांकडे कुठलेही ठोस पुरावे नव्हते; त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यातील बेपत्ता महिला तसेच मुलींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. यासाठी १ ते १९ मार्च असा कालावधी निवडला आणि जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यातील अंमलदारांनी या मिसिंग केसेसवर काम सुरू केले. त्यानंतर पोलिसांकडे उपलब्ध झालेली माहिती एकूणच मिसिंग केसेसबाबत विविध प्रश्न उपस्थित करणारी आहे.

वरील कालावधीमध्ये ८४ महिला तसेच मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वरील ३१ पोलिस ठाण्यात नोंदविल्या गेल्या होत्या. या प्रत्येक केसचा पोलिसांनी मागोवा घेतला असता ८४ पैकी ६० जणींचा ठावठिकाणा आढळून आला. विशेष म्हणजे पोलिस दप्तरी बेपत्ता असलेल्या या ६० पैकी बहुतांश महिला तसेच मुर्तीच्या कुटुंबीयांना आपली मुलगी कुठे आहे, याची माहिती असल्याचे या तपासातून निष्पन्न झाले. पोलिस दप्तरी बेपत्ता असलेल्या ८४ पैकी दहाजणींनी आपला संसार थाटल्याचे आणि त्या संबंधित घरी नांदत असल्याचे दिसून आले. याही महिलांच्या कुटुंबीयांना तसेच नातेवाइकांना याची माहिती होती. मात्र इभ्रतीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी गप्प राहणेच पसंत केले. उर्वरित १४ महिलांचा मात्र या मोहिमेंतर्गत कुठलाही ठावठिकाणा मिळाला नाही.

एकूणच पोलिसांनी राबविलेल्या या शोधमोहिमेनंतर महिला तसेच मुलींच्या मिसिंग केसबाबत काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. आपली मुलगी पळून जाऊन आपल्या इच्छेविरुद्ध कोणाबरोबर तरी संसार थाटते, त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची या मानसिकतेतून पुन्हा मुलीसोबत संबंध तोडले जात असल्याचे दिसून आले. काही प्रकरणात मात्र दीर्घकालावधीनंतर पोलिस दप्तरी मिसिंग असलेल्या या महिलांचे आई-वडिलांकडे जाणे-येणे सुरू असल्याचे आढळले.

एकूणच मिसिंग केसची जेवढी गंभीर व्याप्ती असल्याचे वरकरणी दिसते. प्रत्यक्षात तशी ग्रामीण भागात स्थिती नाही. ग्रामीण भागातून महिला आणि मुर्तीचे मोठ्या प्रमाणात व्ह्यूमन ट्रैफिकिंग होत असल्याची पूर्वी चर्चा होती. मात्र, असा कुठलाही प्रकार नसल्याचे या तपासाच्या लिटमस्ट टेस्टवरून सिद्ध झाला. तसेच ग्रामीण भागातील मुलींचे आई-वडील पैसे घेऊन राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेश या राज्यांत लग्न लावून देत होते. हाही प्रकार मागील दोन वर्षांत जवळपास थांबल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

यवतमाळच्या पोलिसांनी प्रस्तुत केसच्या संदर्भाने ही छोट्या पातळीवर मोहीम राबविली. मात्र, मिसिंग केसेस संदर्भातील राज्यभरातील वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी राज्य पातळीवरच अशा पद्धतीची मिसिंग केसेस पडताळणी मोहीम राबविण्याची गरज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Missing Girls Mystery: Shocking Numbers, Surprising Reality Unveiled

Web Summary : Maharashtra saw 48,278 women go missing in a year, with 11,697 untraced. A murder case revealed that many 'missing' women were known to families, some secretly married, challenging human trafficking assumptions in rural areas. State-level verification is needed.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर