पतीचे निधन झाले अन चौथ्या दिवशी चोरट्यांनी घर फोडले

By योगेश पांडे | Updated: August 23, 2023 14:02 IST2023-08-23T14:01:19+5:302023-08-23T14:02:38+5:30

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

The husband died and on the fourth day thieves broke into the house and stole worth 1.5 lakh | पतीचे निधन झाले अन चौथ्या दिवशी चोरट्यांनी घर फोडले

पतीचे निधन झाले अन चौथ्या दिवशी चोरट्यांनी घर फोडले

नागपूर : पतीचे निधन झाल्यामुळे अगोदरच दु:खात असलेल्या एका महिलेला चोरट्यांनी मोठा धक्का दिला आहे. सासूकडे राहण्यासाठी बाहेर गेलेल्या महिलेकडे चोरट्यांनी घरफोडी करत लाखाहून अधिकचा मुद्देमाल लंपास केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अर्चना संतोष काळे (४५, मनोविहार कॉलनी, हजारी पहाड, गिट्टीखदान) असे संबंधित महिलेचे नाव आहे. अर्चना यांच्या पतीचे काही दिवसांअगोदरच निधन झाले आहे. त्यांच्या सासू घराजवळीच स्वामी कॉलनी येथे राहतात. २१ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून त्यांच्या सासूकडे राहण्यास गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्या घरी परतल्या. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख ३० हजार रुपये असा १.०५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. अर्चना यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The husband died and on the fourth day thieves broke into the house and stole worth 1.5 lakh