तरुणीचा विनयभंग करून विटा मारून केला हल्ला

By योगेश पांडे | Updated: October 30, 2023 18:15 IST2023-10-30T18:15:00+5:302023-10-30T18:15:40+5:30

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

The girl was molested and attacked with bricks | तरुणीचा विनयभंग करून विटा मारून केला हल्ला

तरुणीचा विनयभंग करून विटा मारून केला हल्ला

नागपूर : एका तरुणीशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तिचा विनयभंग केला व त्यानंतर तिच्यावर विटेने हल्ला करत जखमी केले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

दिलीप कृष्णराव ठवकर (४५, वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याची २१ वर्षीय तरुणीशी ओळखी होती. त्याने तिला शुक्रवारी फिरायला चलण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले व तिला निर्जन जागी नेऊन तिचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता त्याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने जवळ पडलेली वीट तिच्या डोक्यात मारली व तिला पाहून घेण्याची धमकी दिली. तिने कशीबशी स्वत:ची सुटका केली व त्यानंतर वाठोडा पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी दिलीपविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Web Title: The girl was molested and attacked with bricks