चक्क पोलीस ठाण्यासमोरील मंदिरातच चोरी, दानपेटीच नेली चोरून

By योगेश पांडे | Updated: April 14, 2023 11:14 IST2023-04-14T11:14:12+5:302023-04-14T11:14:55+5:30

कोतवाली पोलीस स्टेशन समोरील घटना

the donation box was stolen from the temple in front of Kotwali police station of Nagpur | चक्क पोलीस ठाण्यासमोरील मंदिरातच चोरी, दानपेटीच नेली चोरून

चक्क पोलीस ठाण्यासमोरील मंदिरातच चोरी, दानपेटीच नेली चोरून

नागपूर :  शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन समोर असलेल्या कालभैरव मंदिरात चोरी झाली. गुरुवारी रात्री उशिरानंतर चोरट्यांनी मंदिराचे दार तोडून ही चोरी केली. चोरट्यांनी मंदिरातील एक दानपेटी चोरून नेली व दुसरी दानपेटी फोडून पैसे लंपास केले.

आश्चर्याची बाब म्हणजे कोतवाली पोलीस ठाण्याच्या अगदी नजरेच्या टप्प्यात कालभैरव मंदिर आहे. शिवाय मंदिर दाटीवाटीची वस्ती आणि बाजारपेठेत आहे. तरीदेखील तेथे चोरी करण्याचे चोरट्यांनी पाऊल उचलल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: the donation box was stolen from the temple in front of Kotwali police station of Nagpur