क्रूरतेचा कळस...! निवृत्त नायब तहसीलदाराने श्वानाच्या दोन पिलांना जाळले, घटनेने समाजमन सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 07:29 IST2022-04-23T07:28:20+5:302022-04-23T07:29:21+5:30

‘श्वानाची पिलं आधीच जखमी होती. त्यांना खरूज होती. त्यांना दंडा मारला. मात्र, जाळले नाही,’ असे आरोपीने पोलिसांना सांगितल्याचे समजते.

The culmination of cruelty Retired Deputy Tehsildar burnt two puppies of a dog in nagpur | क्रूरतेचा कळस...! निवृत्त नायब तहसीलदाराने श्वानाच्या दोन पिलांना जाळले, घटनेने समाजमन सुन्न

क्रूरतेचा कळस...! निवृत्त नायब तहसीलदाराने श्वानाच्या दोन पिलांना जाळले, घटनेने समाजमन सुन्न

नागपूर: श्वानाची दोन पिलं वारंवार घरात शिरतात, म्हणून एका वृद्धाने त्यांना काठीने बदडून ठार मारले अन् नंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ठेवून जाळले. हे पातक निवृत्त नायब तहसीलदाराच्या हातून घडले आहे. शुक्रवारी दुपारनंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. 

या निवृत्त नायब तहसीलदाराच्या (६५) घरात बेवारस श्वानाची दोन पिलं वारंवार शिरत. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी अंदाजे दोन महिने वयाच्या दोन्ही मुक्या जिवांना आधी काठीने बदडले आणि नंतर त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून पेटवून दिले. रोशनी गावंडे यांनी केलेल्या तक्रारीवरुन आरोपीला ताब्यात घेतले. 

आरोपीचा इन्कार -
‘श्वानाची पिलं आधीच जखमी होती. त्यांना खरूज होती. त्यांना दंडा मारला. मात्र, जाळले नाही,’ असे आरोपीने पोलिसांना सांगितल्याचे समजते. दोन महिन्यांच्या या मुक्या जिवांना हे घर कुणाचे, त्या घरातील व्यक्ती कोण, याची जाण असण्याचा प्रश्नच नाही. नायब तहसीलदार पदावरून निवृत्त व्यक्तीला हे का कळलं नाही, असा सवाल केला आहे. 
 

Web Title: The culmination of cruelty Retired Deputy Tehsildar burnt two puppies of a dog in nagpur