भाऊबंदकी गेली या थराला... सख्ख्या भावालाच फौजदारी प्रकरणात फसविण्याचा कट हायकोर्टाने उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:37 IST2026-02-25T13:36:02+5:302026-02-25T13:37:04+5:30

Nagpur : भाऊबंदकी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रकरणामुळे दिसून आले. कौटुंबिक माल-मत्तेच्या वादातून सख्ख्या भावाला आणि वहिनीला फौजदारी प्रकरणात फसविण्याचा कट रचण्यात आला.

The brotherhood has gone to this level... The High Court foiled a plot to deceive the entire brother in a criminal case | भाऊबंदकी गेली या थराला... सख्ख्या भावालाच फौजदारी प्रकरणात फसविण्याचा कट हायकोर्टाने उधळला

The brotherhood has gone to this level... The High Court foiled a plot to deceive the entire brother in a criminal case

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
भाऊबंदकी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रकरणामुळे दिसून आले. कौटुंबिक माल-मत्तेच्या वादातून सख्ख्या भावाला आणि वहिनीला फौजदारी प्रकरणात फसविण्याचा कट रचण्यात आला. तक्रारकर्त्याचा वाईट हेतू लक्षात आल्यानंतर मुंबई उच्च न्याया-लयाच्या नागपूर खंडपीठाने वादग्रस्त एफ-आयआर व खटला रद्द करून हा कट उधळून लावला.

हे प्रकरण नेरपरसोपंत येथील नारायण इंगळे यांच्या मालमत्तेशी संबंधित आहे. ४१.४९ चौरस मीटर भूखंडाच्या फेरफारमधून नाव वगळण्यात आल्यामुळे शंकर इंगळे यांनी भाऊ साहेबराव, वहिनी विद्या व इतरां- विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. साहेबराव व इतरांनी बनावट कागदपत्रे व खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी २८ सप्टेंबर २०२२ रोजी भादंवि कलम ४२०, ४६८ व ४२४ अंतर्गत एफआ- यआर नोंदवून प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटलाही दाखल केला होता. परिणामी, साहेबराव व विद्या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा एफ-आयआर व खटला रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेवर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाला तक्रारकर्त्याने वाईट हेतूतून या दिवाणी प्रकरणाला फौजदारी प्रकरणाचा रंग दिल्याचे दिसून आले. करिता, न्यायालयाने ही फौजदारी कार्यवाही सुरू ठेवल्यास न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर होईल, असे मत नमूद करून याचिका-कर्त्यांची मागणी मंजूर केली.
 

Web Title : भाई-भाई में ठनी: हाईकोर्ट ने झूठा आपराधिक मामला रद्द किया।

Web Summary : यवतमाल में भाइयों के संपत्ति विवाद में झूठा आपराधिक मामला दर्ज हुआ। हाईकोर्ट ने दुर्भावनापूर्ण इरादे को देखते हुए एफआईआर और कार्यवाही रद्द कर दी, कानूनी प्रक्रिया का दुरुपयोग रोका।

Web Title : Sibling rivalry escalates: High Court quashes false criminal case plot.

Web Summary : Yavatmal brothers' property dispute led to a false criminal case. The High Court, recognizing the malicious intent, quashed the FIR and proceedings, preventing misuse of the legal process.