'त्या' नराधम बापाला फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा; मुलीच्या बलात्कार आणि खुनाचा होता आरोप
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: November 11, 2025 16:49 IST2025-11-11T16:43:29+5:302025-11-11T16:49:00+5:30
Nagpur : ही संतापजनक घटना कळमना पोलिसांच्या क्षेत्रातील आहे. रजकला विशेष सत्र न्यायालयाने २१ मे २०२४ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे.

'That' father sentenced to life imprisonment instead of death; accused of raping and murdering daughter
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीची हत्या करणारा नराधम बाप गुड्डू छोटेलाल रजक (४२) याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व प्रवीण पाटील यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
ही संतापजनक घटना कळमना पोलिसांच्या क्षेत्रातील आहे. रजकला विशेष सत्र न्यायालयाने २१ मे २०२४ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य सरकारने हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले होते. रजक देवीनगर, वांजरा येथील रहिवासी आहे. त्याने तीन लग्न केले होते. दुसरी पत्नी आरतीपासून रजकला दोन मुली व एक मुलगा होता. रजक १६ वर्षीय मोठ्या मुलीवर सतत बलात्कार करीत होता. तसेच, त्याने त्या मुलीला गळफास लावून ठार मारले, असा आरोप होता. परंतु, उच्च न्यायालयात बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे रजकला या गुन्ह्यात निर्दोष ठरविण्यात आले.