शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर नागपुरात थॅलेसेमिया-सिकलसेलचे एक्सलन्स सेंटर

By admin | Updated: January 11, 2016 02:48 IST

थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना एकाच छताखाली सर्व अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर नागपुरात सिकलसेल व थॅलेसेमियाचे ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही : थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरचे उद्घाटननागपूर : थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना एकाच छताखाली सर्व अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर नागपुरात सिकलसेल व थॅलेसेमियाचे ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ केंद्राची घोषणा गेल्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. याचा पाठपुरावा केला जात आहे. या शिवाय थॅलेसेमिया व सिकलसेल रुग्णांना एस.टी.मध्ये मोफत प्रवास व अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून तीन लाखाची मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.डॉ. विंकी रुघवानी चाईल्ड केअर सेंटर, जरीपटका येथील थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने, डॉ. विंकी रुघवानी व विकी कुकरेजा उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, थॅलेसेमिया व सिकलसेल हा रक्तजन्य व अनुवंशिक आजार आहे. हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या हिवाळी अधिवेशनात या दोन्ही आजाराच्या उपचारासाठी उत्तर नागपुरात ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ची घोषणा करण्यात आली होती. याचा पाठपुरावा आ. मिलिंद माने करीत आहे. या सोबतच या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना एस.टी.मध्ये मोफत प्रवास देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी एस.टी. महामंडळाला १० कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. या रुग्णांना जास्तीत जास्त वैद्यकीय सवलती देण्याचा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विवाहपूर्वी मुलामुलीची पत्रिका पाहिली जाते. परंतु पत्रिकेपेक्षा रक्ताची तपासणी करून थॅलेसेमिया व सिकलसेल असण्याची शक्यता पडताळून पाहिल्यास या आजारावर प्रतिबंध बसेल. सरकार याच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेईल. सिकलसेल व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत अस्थिमज्जा प्रतिरोपण हा महत्त्वाचा भाग असतो. यासाठी रुग्णाचा नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. या प्रतिरोपणासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून तीन लाखाची मदत केली जाईल. या कक्षामार्फत आतापर्यंत ५० वर मुलांच्या हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आ. डॉ. माने म्हणाले, सिकलसेल या आजराच्या निर्मूलन हेतू राजकारणात आलो. उत्तर नागपुरात सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णांना एकाच ठिकाणी अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विवाहापूर्वी रक्ताची चाचणी करून निर्णय घेतल्यास हा आजार टाळता येण्यासारखा आहे. प्रास्ताविक डॉ. रुघवानी यांनी केले. त्यांनी थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना येणाऱ्या समस्या मांडत शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली. मेयो व डागा रुग्णालयातून ‘कम्पोनंट’ रक्त दिले जात नसल्याची खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखविली. संचालन अ‍ॅड. वैशाली बागडे यांनी केले. आभार थॅलेसेमिया सोसायटी आॅफ सेंट्रल इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप मोटवानी यांनी मानले. कार्यक्रमाला मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, भाजप नेते जयप्रकाश गुप्ता, सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)