शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मोमिनपुऱ्यात तणाव : बॅरिकेट्स हटवले नाहीत, उशीर झाल्याने वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:50 IST

मोमिनपुरा येथील एका हार्ट अटॅक आलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला मेयो रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले नाहीत. त्यामुळे उपचारास उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. यामुळे मोमिनपुरा परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देसंतप्त नागरिक उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोमिनपुरा येथील एका हार्ट अटॅक आलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला मेयो रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले नाहीत. त्यामुळे उपचारास उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. यामुळे मोमिनपुरा परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.अब्दुल लतीफ अंसारी (८३) रा. तकिया मासूम शाह मोमिनपुरा असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजता घडली. अंसारी यांना ‘हार्ट अटॅक’ आल्याने त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मोमिनपुºयाला लागून असलेल्या मेयो रुग्णालयाकडे जाणारा रस्ता चंद्रलोक बिल्डिंगजवळ बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी अशा अत्यावश्यक प्रसंगातही बॅरिकेट्स उघडले नाही. १५ ते २० मिनिटांचा वेळ वाया घालवला. नातेवाईकांनी मेयो रुग्णालयाची भिंत ओलांडून त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. परंतु तेव्हापर्यंत उशीर झाला होता. रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक नागरिक संतापले. ते भगवाघर चौकात एकत्र आले. घटनेची माहिती होताच तहसीलचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जयेश भांडारकर यांनी घटनास्थळी भेट दिली व नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांचे म्हणणे होते की, मेयो रुग्णालयाकडे जाणारा एक मार्ग उघडायला हवा. यावर भांडारकर यांनी त्यांची मागणी मनपाचे वरिष्ठ अधिकारी व मनपा आयुक्तांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. यानंतर नागरिक शांत झाले. काही नागरिकांचा आरोप आहे की, पोलीस त्यांच्याशी असभ्यपणे वागतात. जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रारही करण्यात आली आहे.ठाणेदार जयेश भांडारकर यांच्यानुसार स्थानिक नागरिक मेयो रुग्णालयाकडे जाणारा एक मार्ग सुरू करण्याची मागणी करीत आहे. दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यांचे रोजगार बंद पडल्याने मनपा प्रशासनावर त्यांची नाराजी आहे. हा रस्ता बंद करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले आहेत. पोलीस केवळ आदेशांचे पालन करीत आहे. त्यांच्या तक्रारी व मागणी मनपा प्रशासन व वरिष्ठांपर्यंत पाहोचवल्या आहेत. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी हे शुक्रवारी मोमिनपुºयाचा दौरा करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी