शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण कारवाईमुळे नागपुरातील माटे चौकात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:23 IST

माटे चौकाजवळील मौजा परसोडी भागात गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईच्या वेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देरहिवाशांकडून नासुप्र कारवाईचा विरोध : पोलिसांनी घटनास्थळाजवळ जाण्यापासून नागरिकांना रोखले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : माटे चौकाजवळील मौजा परसोडी भागात गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईच्या वेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. रहिवाशांनी नासुप्रच्या कारवाईला जोरदार विरोध केला तर पोलिसांनी घटनास्थळाजवळ जाण्यापासून नागरिकांना रोखले होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, परसोडीच्या खसरा क्रमांक ३०/१, ३१/१, ३७/२ आणि ३०/३ स्थित कैसाल गृह निर्माण सहकारी संस्थेतून निघणाऱ्या मार्गाच्या ९ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे. परंतु यात काही घरे येत होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. हे अतिक्रमण हटविण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. सकाळी १०.३० वाजता कार्यकारी अभियंता (पश्चिम) देवेंद्र गौर, विभागीय अधिकारी (पश्चिम) अविनाश बडगे यांच्या नेतृत्वात पथक प्रमुख वसंत कन्हेरे व पथक कारवाईसाठी पोहोचले. कारवाईला होणारा विरोध लक्षात घेता प्रतापनगर पोलीस ठाण्यातील ५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पथकाने कारवाई सुरू करताच काही महिलांनी विरोध सुरू केला. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनी विरोध करणाºया दोन तरुणींनाच ताब्यात घेतले. दुपारपर्यंत तेथील तीन घरे जमीनदोस्त करण्यात आली.घर रिकामे करण्यास वेळ का दिला नाही, ठाकरे संतप्त 
दरम्यान, ही कारवाई होत असताना आमदार विकास ठाकरे यांना स्थानिक रहिवाशांनी माहिती दिली. ते घटनास्थळी पोहोचले. रहिवाशांनी आपले गाऱ्हाणे त्यांच्याकडे मांडले. घरातील सामान हटविण्यासाठीदेखील वेळ न देता कारवाई करण्यात आली. अगोदर कल्पना दिली असती तर कमीतकमी भाड्याचे घर तरी शोधता आले असते, असा आक्रोश महिलांनी केला. विकास ठाकरे यांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करता येणार नाही. परंतु घर रिकामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी रहिवाशांना वेळ द्यायला हवा होता. एरवी मोठमोठ्या प्रतिष्ठानांवर कारवाईसाठी हात आखडता घेतला जातो. परंतु गरिबांच्या घरांवर बुलडोझर तत्परतेने चालविला जातो. माणुसकी दाखविली का गेली नाही, असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर