शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

दहा टक्के नागरिक होमिओपॅथीवर अवलंबून

By admin | Updated: February 14, 2016 02:58 IST

भारताच्या उपचार पद्धतीचा वारसा होमिओपॅथी पद्धतीने आत्मसात केला आहे. या उपचार पद्धतीच्या विश्वसनीयतेमुळे होमिओपॅथीने एक वेगळे स्थान निर्माण केले ...

केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीपाद नाईक : होमिओ-व्हिजन राष्ट्रीय परिषदेला सुरुवात नागपूर : भारताच्या उपचार पद्धतीचा वारसा होमिओपॅथी पद्धतीने आत्मसात केला आहे. या उपचार पद्धतीच्या विश्वसनीयतेमुळे होमिओपॅथीने एक वेगळे स्थान निर्माण केले असून देशातील दहा टक्के जनता आजही आपल्या आरोग्यासंदर्भात होमिओपॅथी उपचार पद्धतीवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी येथे केले. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ होमिओपॅथिक फिजिशियन्स महाराष्ट्र राज्य (आयआयएचपी) तर्फे सिव्हिल लाईन्स येथील चिटणीस सेंटर येथे होमिओपॅथतज्ज्ञांची ‘होमिओ व्हिजन नागपूर-२०१६’ ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. रेन्झो गॅलसी, कोषाध्यक्ष डॉ. अ‍ॅल्टन अगोग्लू, सीसीआरचे महासंचालक डॉ. आर.के. मनचंदा, महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे फॅकल्टी डीन डॉ. व्ही.आर. कवीश्वर, इस्रोचे विरेंद्र कुमार, आयआयएचपीचे अध्यक्ष डॉ. रमाकांत दगडे, डॉ. एम.ए. राव, डॉ. अजय दहाट, व्ही.के. गुप्ता, महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. हरीश धुरट उपस्थित होते. श्रीपाद नाईक म्हणाले, भारतीय उपचार पद्धतींमध्ये संशोधनासाठी आता लक्ष घातले जात आहे. केंद्रीय होमीओपॅथी परिषद आणि अनुसंधान परिषद होमिओपॅथीत संशोधन करण्याबाबत प्रोत्साहन देत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण आणि दुर्गम भागात स्वस्त आणि सुलभ उपचार पद्धतीमुळे माता मृत्यू दर, प्रजनन आणि जन्मलेल्या बाळांच्या मृत्यू दरावर नियंत्रण आणण्यासाठी होमिओपॅथी एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकते. होमिओपॅथीवर लोकांना अधिकाधिक विश्वास वाढावा, यासाठी होमिओपॅथीचे शास्त्रोक्त तत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आयुष मंत्रालयांतर्गत शिक्षण, संशोधन, औषधींचा विकास आणि वैद्यकीय सेवा हे लक्ष्य साध्य करण्याचे कार्य केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी डॉ. कवीश्वर यांनी सांगितले की, राज्यात ६६ हजार होमिओपॅथस्ची नोंदणी आहे. परंतु एकही डिस्पेन्सरी नाही. नागपुरात खासगी कॉलेज व डिस्पेन्सरी आहेत. तेव्हा शासकीय महाविद्यालयसुद्धा सुरू व्हावे, अशी मागणी केली. आर.के. मनचंदा, विरेंद्र कुमार, डॉ. गॅलसी, डॉ. गुप्ता यांनीही आपले विचार व्यक्त केले. रवींद्र दुरुगकर यांनी संचालन केले. डॉ. अजय दहाट यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)