Tell us about the 'bitter' speakers, best humerus reply to the Nagpur police tweet | 'कडू' बोलणाऱ्यांची माहिती आम्हाला द्या, नागपूर पोलिसांच्या ट्विटला भन्नाट उत्तर

'कडू' बोलणाऱ्यांची माहिती आम्हाला द्या, नागपूर पोलिसांच्या ट्विटला भन्नाट उत्तर

मुंबई - देशभरात मकर संक्रांतीचं आनंदी वातावरण असून सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. तिळगुळ घ्या गोड गोड बोला.. असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्यातील तंटा मिटवून, वाद मिटवून प्रत्येकाने आजपासून गोड बोलायला, नव्या मैत्रिला सुरुवात केली पाहिजे, यासाठी हा सण उत्साहात साजरा होतो. नागपूरपोलिसांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नागपूरपोलिसांनी मक्रर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना एक मोबाईल नंबरही शेअर केला आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला... असे म्हणत, जर कोणी कडू बोलत असेल आणि वागत असेल तर आम्हाला कळवा असंही नागपूर शहर पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन म्हटलं आहे. नागपूर पोलिसांच्या या ट्विटला काही भन्नाट रिप्लाय आले आहेत. त्यापैकी, एक रिप्लाय नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहणार नाही. 

एका युजर्सने @Sushils46 या ट्विटर युजर्सला मेंशन करत, हा व्यक्ती नागपूरचा असून लोकांचे लग्न मोडायचे काम करतो, ह्यांच्याकडे बघा, असा रिप्लाय पोलिसांच्या ट्विटला दिला आहे. तर, एकाने तिळगुळ घ्या पण फेककेस करू नका, असे म्हटले आहे.   

Web Title: Tell us about the 'bitter' speakers, best humerus reply to the Nagpur police tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.