शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेतूनच शिक्षण मिळावे

By admin | Updated: January 12, 2015 01:01 IST

आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळाले पाहिजे,

मेधा पाटकर : नागो गाणार यांचा सत्कारनागपूर : आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यक र्त्या मेधा पाटकर यांनी रविवारी व्यक्त केले. खासगी प्राथमिक शिक्षक संघातर्फे अध्यापक भवन येथे आयोजित आमदार नागो गाणार यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर होते.राज्यघटनेत शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आहे. परंतु ही जबाबदारी टाळून सरकार श्रीमंतांसाठी शिक्षणाचे खासगीकरण करू पाहात आहे. शिक्षणमाफियांनाही हेच हवे आहे. सर्वसामान्य व गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावण्याचा डाव आखला आहे. सरकारी अनुदान वाटपातही भ्रष्टाचार आहे. दुसरकडे समाजाच्या पैशातून चालविण्यात येणाऱ्या शाळांत सुविधा नसल्याच्या कारणावरून त्यांना अनुदान नाकारले जात आहे. शिक्षकांनी कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून हक्कासाठी संघर्ष करावा, असे आवाहन त्यांनी केले.खुल्या अर्थव्यवस्थेच्या नावाखाली प्रत्येक क्षेत्राचे बाजारीकरण होत आहे. सर्वच क्षेत्रात विदेशी पैसा व संस्कृती आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहे. कॉर्पोरेट क्षेत्राच्या पैशावर शाळा चालविण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षण ही मूलभूत गरज समजून सरकारने त्याची जबाबदारी स्वीकारावी. मुख्यमंत्र्यानी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. जात, धर्म बाजूला ठेवून समाजसेवेच्या हेतूने संघटना चालविणाऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पाटकर यांच्या हस्ते नागो गाणार यांना शाल-श्रीफळ व मानपत्र देऊ न त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणासाठी शाळा असून यातूनच माणूस घडविण्याची प्रक्रिया होत असल्याने शाळा चालल्या पाहिजे. एका कर्तृत्ववान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याकडून माझा सत्कार होत आहे. त्यांच्या प्रेरणेने यापुढेही संघर्ष करीत राहू, असे मनोगत गाणार यांनी व्यक्त केले. प्रमोद रेवतकर यांनीही मार्गदर्शन केले. संघाचे सचिव विजय नंदनवार यांनी प्रास्ताविकातून संघाच्या वाटचालीची माहिती दिली.विभागाचे संघाचे अध्यक्ष सतीश कटरे, कार्याध्यक्ष सुनील चिचघरे, जिल्हा अध्यक्ष लेकपाल चापले, शहर अध्यक्ष मोहन सोमकुवर, विभागाचे सचिव हेमंत बेलखोडे, जिल्हा सचिव अरुण नवरे व शहर सचिव अतुल टेकोडे आदी उपस्थित होते. संजय बोरगावकर यांनी आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)