शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी बेमुदत संपावर

By admin | Updated: April 28, 2016 02:58 IST

तहसील कार्यालयातील तलाठ्यांनी बुधवारी अचानक बेमुदत संप पुकारला. त्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले.

प्रशासकीय कामकाज खोळंबले : विना प्रशिक्षण आॅनलाईन काम सोपविले जात असल्याने अडचणीनागपूर : तहसील कार्यालयातील तलाठ्यांनी बुधवारी अचानक बेमुदत संप पुकारला. त्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले. आरटीई व हाऊसिंगसंबंधी कामे पूर्णत: ठप्प पडली. महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ, विदर्भ पटवारी संघ आणि विदर्भ मंडळ अधिकारी संघ यांच्या बॅनर अंतर्गत तलाठ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनांतर्गत संप पुकारला. कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय आॅनलाईन प्रक्रियेतील कामे सोपविली जात असल्याने होणाऱ्या अडचणीसुद्धा या आंदोलनाचे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार तलाठ्यांची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे कामाचा बोझा वाढलेला आहे. त्यामुळे तलाठ्यांची संख्या वाढविण्यात यावी. तसेच कुठलेही प्रशिक्षण न देता आॅनलाईन प्रक्रियेतील कामे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी येत आहेत. प्रशिक्षण न मिळाल्याने त्यांना काम करणे कठीण जात आहे. नागरिकांच्याही तक्रारी येत आहेत. याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तहसील कार्यलय परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान राजेश चुटे, विलास सावरकर, अतीक शेख, प्रवीण मेश्राम, अमोल सेलव, माधव वाघमारे, शरद बोरकर, गोपाल फुलुंभरकर, स्वाती सोनारकर, अलका मुळक उपस्थित होते. (प्रतिनिधी)दुर्लक्ष केल्यानेच संप संप करण्यापूर्वी आंदोलनकर्त्या तलाठ्यांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे वेळोवेळी निवेदन दिले होते. ११ एप्रिल रोजी राज्यातील तलाठ्यांनी काम बंद करीत हातावर काळ्या फिती लावून आपला निषेध व्यक्त केला होता. १६ एप्रिल रोजी प्रत्येक तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. परंतु प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नाही. तेव्हा २० एप्रिल रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते. २१ एप्रिल रोजी आॅनलाईन कामकाज प्रक्रियेला विरोध केला होता. तरीही प्रशासनाने कुठली कारवाई केली नाही. अखेर २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्यात आला. तलाठ्यांनी संप मागे घ्यावा तलाठ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्याबाबत शासन व प्रशासन सकारात्मक आहे. सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत तलाठ्याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे तलाठ्यांनी आपला संप स्थगित करून चर्चा करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले आहे.