निर्यातीत योजनांचा लाभ घ्या

By Admin | Updated: July 4, 2014 01:14 IST2014-07-04T01:14:48+5:302014-07-04T01:14:48+5:30

सेझमधील निर्यातीत उद्योगांनी लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पी.एम. पार्लेवार यांनी येथे केले.

Take advantage of the export plans | निर्यातीत योजनांचा लाभ घ्या

निर्यातीत योजनांचा लाभ घ्या

पी.एम. पालीवाल यांचे आवाहन : सेझमधील उद्योग
नागपूर : सेझमधील निर्यातीत उद्योगांनी लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पी.एम. पार्लेवार यांनी येथे केले.
सेझमधील उद्योगांसाठी लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयाच्या विभिन्न योजना आहेत. निर्यातीत मार्केटचा विकास, आयएसओ प्रमाणपत्र, क्लस्टर विकासासाठी शासनाचा १३ कोटींचा निधी असल्याचे पार्लेवार यांनी सांगितले.
मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने एमएसएमई योजना आणि सेझ धोरणांची माहिती देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन एमएडीसीच्या मध्यवर्ती इमारतीच्या सभागृहात बुधवारी करण्यात आले. आयोजन मिहान इंडस्ट्रीज असोएिशन आणि एमएडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बिझसोल कन्सलटन्सीच्या सहकार्याने करण्यात आले. अध्यक्षस्थानी एमएडीसी, नागपूरचे मुख्य अभियंते एस.व्ही. चहांदे तर प्रमुख पाहुणे म्हणून एमएसएमई नागपूरचे संचालक पी.एम. पार्लेवार, बिझसोल कन्सलटन्सीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक नवाल आणि एमएसएमई नागपूरचे सुनील खुजनारे उपस्थित होते. पार्लेवार म्हणाले की, सेझ धोरण आणि अधिनियमावर मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन आणि बिझसोल कन्सलटन्सीने संयुक्तरीत्या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करावे. सुनील खुजनारे यांनी योजनांचे फायदे सांगितले. अशोक नवाल यांनी सेझ धोरणाची प्रक्रिया समजावून सांगितली आणि सेझ संदर्भातील विविध प्रश्नांची उत्तरे दिली. मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर भोजवानी यांनी आभार मानले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजय सोनी, दिलीप पटेल, अलोक पांडेय, प्रमोद खंडेलवाल, संदीप मंगलेकर, निखिल भोजवानी, गीता भोजवानी, यशवंत भोजवानी, वैभव गुजर, अमोल पाटील, मनोहर कोरडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Take advantage of the export plans