शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

विवादित कर योजनांचा लाभ घ्यावा

By admin | Updated: August 1, 2016 02:04 IST

शासनाच्या विक्री विभागाच्या प्रशासकीय विवादित कराच्या समाधान योजनेचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा,

विक्रीकर विभाग : पी.के. अग्रवाल यांचे मत नागपूर : शासनाच्या विक्री विभागाच्या प्रशासकीय विवादित कराच्या समाधान योजनेचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विक्रीकर विभागाचे विभागीय सहआयुक्त पी.के. अग्रवाल यांनी येथे केले. अखिल भारतीय व्यापारी संघटनेच्या (कॅट) नागपूर चॅप्टरच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या नवीन विवादित कर समाधान कायद्यावर कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया उपस्थित होते. अग्रवाल यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात विभिन्न कर कायद्यासंबंधित विवादित कर प्रकरणे अपीलच्या वेगवेगळ्या स्तरावर प्रलंबित आहेत. काही प्रकरणे जुन्या तर काही नवीन कायद्यांतर्गत पडून आहेत. राज्य सरकारने ३१ मार्च २०१२ पर्यंत पारित आदेशानुसार ज्यांचे अपील झाले आहे आणि ज्यांना स्थगनादेश मिळाला आहे, अशा सर्वांसाठी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत अर्ज करून निपटारा करता येणार आहे. या योजनेंतर्गत सरकारने महसूलाचे कोणतेही नुकसान न होता व्याज व पेनाल्टीची सूट देत ही योजना तयार केली आहे. या योजनेचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे अग्रवाल म्हणाले. उपायुक्त विनोद गवई यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरणाच्या माध्यमातून कायद्याची विस्तृत माहिती दिली. ३१ मार्च २०१२ पर्यंत वा त्यापूर्वी कायदेशीर आदेश मिळाला आहे आणि त्यावर अपील प्रलंबित आहे व उर्वरित राशीवर स्थगनादेश मिळालेल्या प्रकरणात योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अपील मागे घेऊन योजनेंतर्गत रक्कम ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत वा त्यापूर्वी जमा करावी लागेल. फॉर्म क्र. १ भरून सहीसह नोडल अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल. या फॉर्मसोबत ज्या आदेशात या योजनेचा फायदा घेण्यात येत आहे, त्याची प्रतिलिपी व स्थगनादेशाची प्रतिलिपी जोडायची आहे. व्यावसायिकांनी राज्य सरकारच्या विवादित कर योजना लाभ घ्यावा, असे आवाहन ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी यावेळी केले.