क्षेत्र सहायकावर निलंबनाची कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST2021-03-07T04:08:46+5:302021-03-07T04:08:46+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगत असलेल्या चिकना बीटचे क्षेत्र सहायक घनश्याम टाक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात ...

Take action to suspend the field assistant | क्षेत्र सहायकावर निलंबनाची कारवाई करा

क्षेत्र सहायकावर निलंबनाची कारवाई करा

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगत असलेल्या चिकना बीटचे क्षेत्र सहायक घनश्याम टाक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी चिकना ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकाेडकर यांना निवेदन साेपविले आहे.

चिकना बीटचे क्षेत्र सहायक घनश्याम टाक यांनी ग्रामविकास समितीचे सचिव या नात्याने कधीही सभा घेतली नाही. तसेच या समितीच्या माध्यमातून शासनाने अभयारण्यालगत गावकऱ्यांना माेफत गॅस कनेक्शन दिले. यात लाभार्थ्यांना पहिल्या वर्षी १२ सिलिंडर, दुसऱ्या वर्षी आठ व तिसऱ्या वर्षी सहा सिलिंडर रिफिलिंग करून द्यायचे हाेते. मात्र अद्यापही लाभार्थ्यांना रिफिलिंगचा पुरेपूर लाभ मिळाला नाही. तसेच दीनदयाल उपाध्याय याेजनेंतर्गत अभयारण्यालगतच्या गाववासीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी, विविध विकास कामांसाठी शासनातर्फे २५ लाखाचा निधी प्राप्त हाेऊन ताे खर्च केला नाही. याप्रकरणी वरिष्ठांनी सखाेल चाैकशी करून दाेषी आढळल्यास संबंधित क्षेत्र सहायकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी चिकना ग्रामपंचायतचे सरपंच बाबुराव माेटघरे, उपसरपंच तुळशीदास कळंबे, लीलाधर धनविजय व ग्रामस्थ उपस्थित हाेते.

Web Title: Take action to suspend the field assistant