शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

उर्सच्या आधी बदलणार ताजाबादचा चेहरामोहरा

By admin | Updated: August 10, 2015 02:52 IST

पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ताजाबाद शरीफचा चेहरामोहरा उर्सच्या आधी बदलणार आहे. येथे सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यात आली

विकासाला गती : राज्य शासनाने दिले १३२ कोटीराघवेंद्र तिवारी  नागपूरपर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ताजाबाद शरीफचा चेहरामोहरा उर्सच्या आधी बदलणार आहे. येथे सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यात आली असून या विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात ठरविलेली कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. हजरत बाबा ताजुद्दीन औलिया ट्रस्टचे अध्यक्ष हाजी शेख हुसेन यांनी सांगितले की, योजनेच्या पहिल्या टप्प्यात हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या दरगाहजवळ आठ एकरवर ही विकासकामे होणार आहेत. सपाटीकरण, सौंदर्यीकरण, कॉरीडोरची निर्मिती, शॉपिंग कॉम्प्लेक्स, लंगर, भव्य द्वार, मुख्यद्वाराचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. सध्या ताजाबाद शरीफच्या जवळच्या परिसर सपाट करण्यात येत आहे. विकासकामांसाठी राज्य शासनाने १३२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यात ८० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून कामाचे वाटपही करण्यात आले आहे. दगडांची सुरक्षा भिंतबाबा ताजुद्दीनच्या दरगाह, दुधिया विहिर, लंगरखाना, मस्जिद, परचम आणि मुख्य स्थानांच्या सभोवतालची सुरक्षा भिंत जेसमलेरच्या पिवळ्या बलुवा दगडापासून तयार करण्यात येत आहे. भिंतीची उंची जमिनीपासून साडेचार फूट आणि खांबांची उंची पाच फूट राहणार आहे. दुरूनच दिसणार दरबारट्रस्टचे सचिव इकबाल वेलची यांच्या मते या योजनेत उमरेड रोडवरूनच भाविकांना बाबा ताज यांचा दरबार दिसावा, अशी योजना आहे. या परिसरात प्रत्येक ठिकाणी हिरवेगार वृक्ष लावण्यात येणार आहेत. चार भव्य प्रवेशद्वारट्रस्टचे कोषाध्यक्ष अ‍ॅड. व्ही. के. फ्रान्सिस यांच्या मते दरगाहजवळ पोहोचण्यासाठी चार भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. यातील एक द्वार उमरेड रोडच्या दिशेत राहील. दुसरे द्वार आशीर्वादनगरकडे राहील. अनेक भाविक धार्मिक मान्यतेनुसार ताजुद्दीन बाबांच्या पायाकडून प्रवेशाला पसंती देतात. माहितीनुसार बाबांच्या कब्रमध्ये त्यांचे डोके उत्तरेकडे तर पाय दक्षिणेकडे आहेत. त्यामुळे एक भव्य द्वार दक्षिणेकडे उभारण्यात येईल. एक द्वार मेळा मैदानाकडे राहील तर चौथे द्वार पश्चिम दिशेकडे मस्जिदजवळ राहील.दुधिया विहिरीजवळ शॉवरबाबा ताजुद्दीन यांच्याशी निगडित पवित्र दुधिया विहीर भाविकांसाठी महत्त्वाची आहे. या विहिरीत आंघोळ केल्यानंतर आजार दूर होतात. त्यामुळे या विहिरीजवळ स्त्री-पुरुषांसाठी शॉवरची सुविधा करण्यात येणार आहे. विहिरीत आघोळ करण्यापूर्वी भाविक शॉवरने आंघोळ करतील.भव्य लंगरखाना बाबा ताजुद्दीन यांच्या दरबारात दर गुरुवारी छब्बीसवीला आणि उर्सच्या वेळी नियोजन वितरित करण्यात येते. त्यासाठी दरगाहच्या पश्चिम उत्तर दिशेला एक लंगरखाना तयार करण्यात आला आहे. सात हजार चौरसफूटातील या लंगरखान्यात अडीच हजार भाविक एकाच वेळी भोजन करू शकतील. येथे एक भव्य स्वयंपाकघरही तयार करण्यात आले आहे. विकास योजनेसाठी १३२ कोटीपर्यटनाच्या रूपाने विकसित करण्यासाठी संपूर्ण योजनेसाठी खर्च १३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही योजना तीन टप्प्यात पूर्ण होणार असून पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे.शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी ८ कोटी, दरबाराच्या सौंदर्यीकरणासाठी ३६ कोटी, लंगरखाना, शौचालय, पादत्राणे यासाठी ११ कोटीचा प्रस्ताव आहे. याशिवाय आणखी १० कोटींची कामे होणार आहेत. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरूहोणार आहे. ऐतिहासिक परचम काढणार नाहीयोजनेत सर्व स्थळात बदल करण्यात येत आहे. परंतु बाबा ताज दरबार आणि बाबा ताज यांच्यातर्फे स्थापन करण्यात आलेला परचम काढण्यात येणार नाही.