प्रेयसीशी संबंध असल्याचा संशय, तिच्या मित्रावरच केला प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:05 IST2026-03-10T16:04:56+5:302026-03-10T16:05:51+5:30

Nagpur : प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन एका तरुणाने तिच्या मित्रावरच प्राणघातक हल्ला केला. सदरमधील मेश्राम चौकाजवळ ही घटना घडली.

Suspected of having an affair with his girlfriend, he attacked her friend | प्रेयसीशी संबंध असल्याचा संशय, तिच्या मित्रावरच केला प्राणघातक हल्ला

Suspected of having an affair with his girlfriend, he attacked her friend

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन एका तरुणाने तिच्या मित्रावरच प्राणघातक हल्ला केला. सदरमधील मेश्राम चौकाजवळ ही घटना घडली.

मोनिश रजा शेख युनूस शेख (२१, चंद्रपूर) असे जखमीचे नाव आहे. तो नागपुरात ताजनगर परिसरात राहतो. तर अयान खान (२३, मोमीनपुरा), फरहान व मुब्बशिर (सदर) हे आरोपी आहेत. मोनिश हा एका खासगी महाविद्यालयात विद्यार्थी आहे. अयानची प्रेयसी मोनिशची वर्गमैत्रीण आहे आणि ते वारंवार संवाद साधतात. यामुळे अयानला मोनिशचे त्याच्या प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. अयानने मोनिशला त्याच्या प्रेयसीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र कुठलेही प्रेमसंबंध नसल्याने मोनिशने ही बाब जास्त गंभीरतेने घेतली नाही. यामुळे संतापलेल्या अयानने मोनिशला फोन करून सदरमधील हल्दीरामजवळ बोलविले. रविवारी सकाळी ५:३० वाजता मोनिश तेथे पोहोचला.

अयान आणि त्याचे मित्र फरहान व मुबाशिर तिथे आधीच उपस्थित होते. त्यांनी मोनिशचा मोबाइल फोन घेतला आणि चॅट्स वाचायला सुरुवात केली. त्यांना कळले की चॅट्स डिलीट झाल्या आहेत. रागाच्या भरात त्यांनी मोनिशशी वाद घालण्यास सुरुवात केली.

अयानने मोनिशला जीवे मारण्याची धमकी दिली. यादरम्यान आरोपींनी मोनिशच्या मानेवर चाकू आणि काठीने वार केले. मोनिशने चपळता दाखवत तेथून पळ काढला व काही अंतरावर उभ्या असलेल्या त्याच्या मित्रांजवळ गेला. ते तिघेही आरोपींजवळ गेले असता अयानने मोबाइलने त्यांचा व्हिडीओ काढत धमकी दिली व मोनिशचा मोबाइल घेऊन पळ काढला. मोनिशवर उपचार सुरू असून त्याच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : गर्लफ्रेंड के संबंध के शक में युवक ने दोस्त पर किया हमला।

Web Summary : नागपुर में एक युवक ने गर्लफ्रेंड के साथ संबंध के शक में उसके दोस्त पर चाकू और डंडे से हमला किया। मोनिश नाम के पीड़ित को धोखे से बुलाया गया, पीटा गया और लूट लिया गया। पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Jealous man attacks friend over suspected affair with girlfriend.

Web Summary : Suspecting an affair, a Nagpur man attacked his girlfriend's friend with a knife and stick. The victim, Monish, was lured to a meeting, assaulted, and robbed. Police have registered a case against the accused.