शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सुनील केदारांना हायकोर्टाचा दणका

By admin | Updated: July 2, 2015 03:06 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी आमदार सुनील केदार यांना जोरदार दणका देताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याशी संबंधित..

४० हजार रुपयांचा खर्च बसवला : चौकशी अधिकाऱ्याच्या नोटीसविरुद्धची याचिका खारीजनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी आमदार सुनील केदार यांना जोरदार दणका देताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याशी संबंधित एक याचिका फेटाळली आणि ४० हजार रुपयांचा खर्चही बसवला.न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. निरर्थक याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ व्यर्थ घालवल्यामुळे केदार यांच्यावर खर्च बसविण्यात आला आहे. केदार यांनी प्रत्येक प्रतिवादीला १० हजार रुपये खर्च द्यावा, असा आदेश न्यायालयाने निर्णयात दिला आहे. याचिकेत राज्य शासनाच्या सहकार विभागाचे सचिव, चौकशी अधिकारी अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे, विभागीय सह-निबंधक सहकारी संस्था व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक या चौघांना प्रतिवादी करण्यात आले होते. यामुळे केदार यांना एकूण ४० हजार रुपये खर्च द्यावा लागणार आहे. १४ जून २०१४ रोजी तत्कालीन सहकारमंत्र्यांनी घोटाळ्याची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर नवीन चौकशी अधिकारी खरबडे यांनी केदार यांच्यासह संबंधित आरोपींना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ७२ (४) अंतर्गत नोटीस बजावली. परंतु, नाबार्ड व जिल्हा उपनिबंधकाद्वारे नामनिर्देशित सदस्यांना नोटीस जारी करण्यात आलेली नाही. यावर केदार यांनी आक्षेप घेतला होता. खरबडे यांनी या दोन सदस्यांचा घोटाळ्याशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देऊन आक्षेप फेटाळून लावले होते. याविरुद्ध केदार यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. केदार यांच्यातर्फे अ‍ॅड. ए. एम. घारे तर, मध्यस्थातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.