मेळघाट येथील संपूर्ण बांबू केंद्राचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 10:02 IST2021-05-20T10:01:12+5:302021-05-20T10:02:30+5:30

सुरुवातीस त्यांनी नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट प्रकल्पात ही कार्य केले होते.

Sunil Deshpande, president of the sampoorna Bamboo Center at Melghat, died due to corona | मेळघाट येथील संपूर्ण बांबू केंद्राचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांचे कोरोनामुळे निधन

मेळघाट येथील संपूर्ण बांबू केंद्राचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांचे कोरोनामुळे निधन

नागपूर- संपूर्ण बांबू केंद्र लवादा मेळघाटचे संस्थापक वेणूपुत्र सुनील गुणवंतराव देशपांडे यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. नागपूर येथील किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
M.S.W केल्यानंतर, आर्किटेक्ट विनू काळे यांच्या प्रेरणेने त्यांनी बांबू हे आपले कार्यक्षेत्र ठरवले होते. अखिल भारतीय कारागीर पंचायतचे ते राष्ट्रीय संघटक होते. सुरुवातीस त्यांनी नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट प्रकल्पात ही कार्य केले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी डॉ. निरुपमा, कन्या मुग्धा व मोठा कार्यकर्ता परिवार आहे.
 

Web Title: Sunil Deshpande, president of the sampoorna Bamboo Center at Melghat, died due to corona