पॅथॉलॉजीत काम करणाऱ्या युवतीची आत्महत्या, गफळास घेऊल संपविले जीवन

By दयानंद पाईकराव | Updated: August 5, 2023 18:06 IST2023-08-05T17:58:39+5:302023-08-05T18:06:22+5:30

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Suicide of young woman working in pathology | पॅथॉलॉजीत काम करणाऱ्या युवतीची आत्महत्या, गफळास घेऊल संपविले जीवन

पॅथॉलॉजीत काम करणाऱ्या युवतीची आत्महत्या, गफळास घेऊल संपविले जीवन

नागपूर : पॅथालॉजीत काम करणाऱ्या एका २२ वर्षांच्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. सिमरन लक्ष्मण महाकाळ (वय २२, रा. गुप्ता किराणाजवळ, रामटेकेनगर, अजनी) असे गळफास घेतलेल्या युवतीचे नाव आहे.

सिमरनने नर्सिंगचे शिक्षण घेतले होते. ती बेसा परिसरातील एका पॅथालॉजी लॅबमध्ये कामही करीत होती. तिच्या कुटुंबात आई आणि भाऊ आहे. सिमरनच्या वडिलांचे निधन झाले आहे. सिमरन १८ वर्षांची असताना तिचे लग्न झाले होते. परंतु वर्षभरात ती पतीपासून विभक्त होऊन आई व भावाकडे राहत होती. घटनेच्या दिवशी तिने आपल्या राहत्या घरी सिलींग फॅनला लाल रंगाची ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

या प्रकरणी मनिष लक्ष्मण महाकाळ (वय ५०) यांनी दिलेल्या सूचनेवरून अजनीचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक लामतूरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. प्रेमप्रकरणातून सिमरनने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती असून अजनी पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.

Web Title: Suicide of young woman working in pathology