शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

नागपुरात उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या कारण गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 11:23 PM

Highly educated young woman Suicide हुडकेश्वरमधील एका उच्चशिक्षित तरुणीसह तिघांनी आत्महत्या केली. तरुणीचे नाव निकिता युवराज खापेकर (वय ३२) आहे. ती हुडकेश्वरच्या लक्ष्मणनगरात राहात होती. एमबीए झालेली निकिता पुण्याच्या एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती. तिचे काही दिवसांपूर्वीच लग्न जुळले होते आणि जूनमध्ये लग्न समारंभ पार पडणार होता.

ठळक मुद्देपुढच्या महिन्यात होते लग्न

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हुडकेश्वरमधील एका उच्चशिक्षित तरुणीसह तिघांनी आत्महत्या केली. तरुणीचे नाव निकिता युवराज खापेकर (वय ३२) आहे. ती हुडकेश्वरच्या लक्ष्मणनगरात राहात होती. एमबीए झालेली निकिता पुण्याच्या एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती. तिचे काही दिवसांपूर्वीच लग्न जुळले होते आणि जूनमध्ये लग्न समारंभ पार पडणार होता. निकिताला वडील नसून तिची आई रेल्वेत नोकरीला आहे.

निकिता तिच्या करिअरच्या अनुषंगाने काही दिवसांपासून चिंतित होती. तिच्या नातेवाइकांजवळ करिअरबाबत ती सतत चिंता व्यक्त करायची. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी सकाळी १०.४५ झाले तरी ती तिच्या रूम बाहेर आली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिला आवाज दिला. नंतर आईने निकिताचे ज्याच्यासोबत लग्न जुळले आहे त्यालासुद्धा बोलवून घेतले. त्यांनी दार तोडून बघितले असता निकिता आतमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. तिला त्यांनी खाली उतरवले आणि पोलिसांना माहिती दिली. हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी निकिताच्या रूममध्ये तपासणी केली. तिच्या मोबाइलचीही पाहणी केली. मात्र सुसाइड नोट अथवा दुसरे काहीही आढळले नाही. दरम्यान, निकिताने आत्महत्या का केली, हे स्पष्ट झाले नसून मंजू राजकुमार वेळेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

तरुणाने लावला गळफास

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौतमनगर भिवसन खोरीमध्ये राहणारा महेश जियालाल महतो (वय २५) याने गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. सुरेश मोतीलाल महतो यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

विष पिऊन आत्महत्या

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेताजी नगरात राहणारे प्रफुल्ल अर्जुन धांडे (वय ३२) यांनी ४ मेच्या रात्री विष पिले होते. उपचारासाठी त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे १२ मेच्या पहाटे डॉक्टरांनी धांडे यांना मृत घोषित केले. शिशुपाल फत्तुजी बांडेबुचे (रा. पारडी) यांनी दिलेल्या माहितीवरून कळमना पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर