शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

जुलैपर्यंत कपाशीची यशस्वी लागवड

By admin | Updated: July 3, 2014 00:45 IST

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पावसाकडे लागले आहे. पावसाअभावी सर्वच पिकांसोबत कपाशीची पेरणीदेखील लांबणीवर पडली आहे. या नगदी पिकाशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणे अवघड असल्यामुळे हे पीक सोडणे

बैनाडे यांची माहिती : नुजीविडू सीडस्चे बियाणे बाजारातनागपूर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पावसाकडे लागले आहे. पावसाअभावी सर्वच पिकांसोबत कपाशीची पेरणीदेखील लांबणीवर पडली आहे. या नगदी पिकाशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणे अवघड असल्यामुळे हे पीक सोडणे त्यांना शक्य नाही. अशा परिस्थितीत योग्य नियोजन करून नवीन तंत्रज्ञानाने अर्थात सघन लागवड पद्धतीने कपाशीची लागवड जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते, असे प्रतिपादन नुजीविडू सीडस्चे डॉ. एस.एस. बैनाडे यांनी केले. गेल्या दहा वर्षात पडलेला पाऊस आणि आणि कपाशी लागवड कालावधीचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल की, कपाशी पिकविणाऱ्या बऱ्याचशा भागात बहुतांश वेळी कपाशीची लागवड जूनअखेर ते २० जुलैदरम्यान झालेली आहे. क्वचितच १५ जूनपूर्वीच्या लागवडीने वेळ साधली आहे. कपाशीमध्ये बीटी तंत्रज्ञान नसतानाही १५ जुलैपूर्वी लागवड झालेल्या कपाशीपासून भरघोस उत्पादन मिळविणारे बरेच शेतकरी आहेत. खरीप २००८ च्या हंगामात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड होऊनही चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की, अद्याप कपाशी लागवडीची वेळ गेलेली नाही. ३१ जुलैपर्यंतदेखील कपाशीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. जुलै महिन्यात पेरणी साधण्यासाठी आणि सघन लागवडीसाठी नुजीविडू सीडस्चे मालिनी, भक्ती, बलवान आणि सोना या वाणाचे परिणाम अतिशय चांगले असून, विविध हवामानात येण्याची क्षमता असल्यामुळे हमखास उत्पादनाची हमी मिळते. बैनाडे यांनी यांनी सघन लागवड अवलंब करण्याच्या पद्धतीवर जोर दिला. एकरी १४ हजारापेक्षा जास्त झाडसंख्या ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विषम अंतर ठेवणे, वाढ नियंत्रण आणि खताचा आवश्यक वापर करण्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर किडी-कीटकांचा बंदोबस्त करून अशा तऱ्हेने पिकाचे व्यवस्थापन करून जुलै महिन्याच्या शेवटपर्यंतही लागवड केल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळू शकते. नुजीविडू सीडस्चे कपाशी बियाणे बाजारात उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन डॉ. बैनाडे यांनी केले. (वाणिज्य प्रतिनिधी)