शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी दिला ‘व्याघ्र संवर्धना’चा संदेश

By admin | Updated: August 5, 2015 02:50 IST

वन विभाग, सामाजिक वनीकरण व नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ‘ग्लोबल टायगर डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.

वन विभाग : ‘ग्लोबल टायगर डे’ साजरा नागपूर : वन विभाग, सामाजिक वनीकरण व नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ‘ग्लोबल टायगर डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. यात शालेय विद्यार्थ्यांनी भव्य रॅलीच्या माध्यमातून ‘व्याघ्र संवर्धनाचा’ संदेश दिला. सर्वप्रथम सकाळी ७ वाजता महाराजबाग येथून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर शालेय विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे, रात्रभरापासून सर्वत्र धो धो पाऊस सुरू असताना, या दोन्ही रॅलीमध्ये नागपूरकरांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीमध्ये शहरातील दहा शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दोन्ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांनी फिरल्यानंतर महाराजबाग येथे समारोप करण्यात आला. यानंतर लगेच सकाळी १० वाजता महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते व्हेरायटी चौकात ‘मूड अ‍ॅण्ड फॅक्टस् अबाऊट टायगर’ या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी, उपवनसंरक्षक जयतो बॅनजी, संजय देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, विनीत अरोरा, उमेश धोटेकर व स्वानंद सोनी उपस्थित होते. दुपारी डॉ. आंबेडकर महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. त्यानुसार यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक महीप गुप्ता होते. अतिथी म्हणून उपसंचालक किशोर मिश्रीकोटकर, गोपाल ठोसर, संजय देशपांडे व प्रफुल भांबुलकर उपस्थित होते. दरम्यान याच सभागृहात ‘ग्लोबल टायगर डे’ उत्सवाचा समारोप समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महीप गुप्ता यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)