शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्यांच्या समर्थनार्थ सरसावले विद्यार्थी

By admin | Updated: November 9, 2016 03:17 IST

एखाद्या शिस्तप्रिय प्राचार्यांवर आरोप होत असतील तर विद्यार्थी त्यांच्या समर्थनार्थ एकत्रितपणे उभे राहतात,

नागपूर विद्यापीठ :तक्रारी खोट्या असल्याचा दावानागपूर : एखाद्या शिस्तप्रिय प्राचार्यांवर आरोप होत असतील तर विद्यार्थी त्यांच्या समर्थनार्थ एकत्रितपणे उभे राहतात, असे दृश्य साधारणत: चित्रपटांमध्ये दिसून येते. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील मंगळवारी असेच चित्र दिसून आले. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थी प्राचार्यांच्या समर्थनार्थ पुढे आले. प्राचार्यांविरोधात होत असलेल्या तक्रारी खोट्या असून याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.लाखनी तालुक्यात समर्थ शिक्षण संस्थेतर्फे संचालित समर्थ महाविद्यालय आहे. डॉ.संजय पोहरकर हे या महाविद्यालयाचे गेल्या अनेक वर्षांपासून प्राचार्य आहेत. शिस्तीसाठी ते प्रसिद्ध असून त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक शैक्षणिक सुधारणादेखील झाल्या. मात्र अंतर्गत राजकारणातून त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप काही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. काही प्राध्यापकदेखील त्यांच्यात सहभागी आहे. हे विद्यार्थी वर्गखोल्यांमध्ये जाऊन प्राचार्यांच्या विरोधात खोटानाटा प्रचार करत असून यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तासिकादेखील विस्कळीत झाल्या आहेत. डॉ. पोहरकर यांना काही मूठभर विद्यार्थी व प्राध्यापकांकडून अंतर्गत राजकारणातून ‘टार्गेट’ करण्यात येत असल्याचा आरोप विद्यापीठात आलेल्या विद्यार्थ्यांनी केला.यासंदर्भात या विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. शिक्षणसंस्था व विद्यापीठाने यात मध्यस्थी करून अंतर्गत राजकारणातून करण्यात आलेले षड्यंत्र उधळून लावावे व महाविद्यालयात अभ्यासाचे वातावरण परत निर्माण करण्यासाठी प्राचार्यांच्या पाठीशी उभे रहावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. जर मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. (प्रतिनिधी)