शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’मध्ये उपराजधानीतील विद्यार्थी माघारले

By admin | Updated: August 18, 2016 02:06 IST

‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’च्या (नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकालात उपराजधानीतील विद्यार्थी माघारले आहेत.

अनेकांनी धरले ‘एमएचटी-सीईटी’ला जबाबदार नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’च्या (नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकालात उपराजधानीतील विद्यार्थी माघारले आहेत. परीक्षेत नागपूरसह विदर्भातील विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ‘रँकिंग’ माघारली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार उज्ज्वल राठी याने ७२० पैकी ५७८ गुण मिळवित शहरातून प्रथम स्थान मिळविले आहे. निनाद खांडेकर याला ५४२, निर्मल राठीला ५३९ गुण मिळाले आहेत. ‘नीट’ देणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी ‘एमएचटी-सीईटी’मध्ये चांगले गुण मिळवित पहिल्या २५ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले होते. परंतु ‘नीट’मध्ये त्यांचे ‘रँकिंग’ खालावले. ‘नीट’चे निकाल लक्षात घेता ‘सीबीएसई’ने ‘कट आॅफ’ गुणांत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. १४५ गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यालादेखील समुपदेशन फेरीत सहभागी होण्याची संधी मिळेल. ‘नीट’च्या निकालासाठी अनेकांनी ‘एमएचटी-सीईटी’ला जबाबदार धरले आहे. ‘एमएचटी-सीईटी’त अकरावीच्या अभ्यासक्रमाचा समावेश नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अकरावीच्या अभ्यासावर जास्त लक्ष दिले नाही. परंतु त्यांना ‘नीट’मध्ये अडचणीचा सामना करावा लागला.(प्रतिनिधी) विदर्भात १३६ जागा ‘नीट’मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय कोट्याअंतर्गत आरक्षित असलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येतील. विदर्भातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांत १३६ जागा आहेत. यातील ‘बीडीएस’च्या सात जागा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत. या जागांवर प्रवेशासाठी समुपदेशन फेरीला २२ आॅगस्टपासून सुरुवात होईल.