स्वाध्याय सोडविण्यात नागपूर विभागातील विद्यार्थी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST2021-01-08T04:20:04+5:302021-01-08T04:20:04+5:30

नागपूर : ९ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू झाल्या आहे तर १ ते ८ वर्गातील विद्यार्थी अजूनही घरातच असून ...

Students from Nagpur division lead in solving homework | स्वाध्याय सोडविण्यात नागपूर विभागातील विद्यार्थी आघाडीवर

स्वाध्याय सोडविण्यात नागपूर विभागातील विद्यार्थी आघाडीवर

नागपूर : ९ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू झाल्या आहे तर १ ते ८ वर्गातील विद्यार्थी अजूनही घरातच असून ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास करीत आहे. जे विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी शासनामार्फत स्वाध्याय हा उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत ७ स्वाध्याय विद्यार्थ्यांनी सोडविले असून, नागपूर विभागात त्यात अव्वल आहे.

कोरोना काळात मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शासनाने टीलीमीली, दीक्षा अ‍ॅप आदी माध्यमांचा वापर केला. यातून मुले कशी शिकत आहे, याचे मुलांनी स्वत:च मूल्यांकन करावे, यासाठी स्वाध्यायच्या माध्यमातून त्यांचा सराव करण्यात येत आहे. हा उपक्रम व्हॉट्सअ‍ॅप बेस आहे. वर्ग १ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे. त्यांना प्रत्येक शनिवारी भाषा व गणिताचे १० प्रश्न देण्यात येतात. त्यासाठी त्यांना एक आठवड्याचा वेळ देण्यात येतो. मुलांनी प्रश्न सोडविल्यानंतर ते चूक की बरोबर बघण्यासाठी लगेच उत्तरपत्रिका उपलब्ध होते. दर आठवड्याला नागपूर विभागातील लाखो विद्यार्थी स्वाध्यायची वाट बघतात, जसा स्वाध्याय पडला तसा भराभर सोडवितात.

- स्वाध्यायबेस उपक्रम अध्ययन निष्पत्ती आधारीत कार्यक्रम आहे. ही एकप्रकारे नियमित परीक्षा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य आदींचा यात सक्रिय सहभाग असल्याने, नागपूर विभागातून याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

रवींद्र रमतकर, समन्वयक, स्वाध्याय उपक्रम

- आता उर्दूतही स्वाध्याय

शालेय शिक्षण विभागाने राज्यभरात स्वाध्यायला मिळत असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लक्षात घेता उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा स्वाध्याय उपक्रम सुरू केला आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी त्याचे उद्घाटन केले.

Web Title: Students from Nagpur division lead in solving homework