शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात लवकरच दिसणार ‘स्टुडंट पोलीस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:19 IST

सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांचे प्रशिक्षण देऊन ‘स्टुडंट पोलीस कॅडेट्स’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यातील १९ सरकारी शाळांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या कामकाजाचे मिळणार धडे१९ सरकारी शाळेत निवड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांचे प्रशिक्षण देऊन ‘स्टुडंट पोलीस कॅडेट्स’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १९ सरकारी शाळांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेतील वर्ग ८ व ९ चे ६० विद्यार्थी निवडण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील नगर परिषद माध्यमिक हायस्कूलमधून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुशासन आणि कायद्याचेही ज्ञान मिळणार आहे.स्टुडंट पोलीस कॅडेट या उपक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेबद्दल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व्यापक विकास व्हावा, देशभक्ती व सेवेची मूल्ये वाढविण्याची क्षमता निर्माण व्हावी, असा उद्देश यामागे आहे. पोलीस दल आधुनिकीकरण योजनेंतर्गत जिल्हास्तरावर सुकाणु समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून, अप्पर पोलीस अधीक्षक हे सदस्य सचिव व प्राथमिक शिक्षणाधिकारी हे सदस्य आहे. या समितीच्या समन्वयातून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.या प्रशिक्षणाचे दोन टप्पे करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, कम्युनिटी पोलिसिंग आणि विद्यार्थी, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरुकता, समाजातील सर्व वाईट गोष्टी विरुध्द लढा, महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचार विरुध्द लढा, आपत्ती व्यवस्थापन, मुल्ये आणि नीतीशास्त्र, संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडिलधाऱ्यांचा आदर करणे, वृत्ती, संघभावना, शिस्त आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात येईल. दुसºया टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयाच्या भेटी देऊन होत असलेल्या कामकाजासंदर्भात माहिती देण्यात येईल. या प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी म्हणून नागपूर (ग्रा.) पोलीस दलाच्या भरोसा सेलचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद धवड, जि.प. प्राथमिक विभागाचे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखेडे आदी राहणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस