शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

अजबच; केवळ सल्ला देण्यासाठी दररोज मिळणार २५ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:38 IST

Nagpur News महाराष्ट्र सरकारच्या महापारेषण कंपनीत सल्लागारांच्या नियुक्तांमध्ये अजबच प्रकार घडला आहे. कंपनीने तांत्रिक विशेतज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती तर केली पण आतापर्यंत मानधनासोबतच जबाबदारी व सेवा अटी निश्चित झालेल्या नाहीत.

ठळक मुद्दे महापारेषणमध्ये सल्लागारांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्हनियुक्ती दिली, पण मानधन, जबाबदारी निश्चित नाही

कमल शर्मा

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या महापारेषण कंपनीत सल्लागारांच्या नियुक्तांमध्ये अजबच प्रकार घडला आहे. कंपनीने तांत्रिक विशेतज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती तर केली पण आतापर्यंत मानधनासोबतच जबाबदारी व सेवा अटी निश्चित झालेल्या नाहीत. दुसरीकडे डिस्पॅच सेंटरला सल्ला देण्यासाठी नियुक्त सल्लागाराला दररोज २५ हजार रुपये देण्यात येणार आहे. चहा, नाश्ता, जेवण आणि वाहनासाठी वेगळा भत्ता मिळणार आहे.

महापारेषणने कंपनीचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता दीपक रोकडे यांना तांत्रिकी विशेषज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्त केले आणि नियुक्तीपत्रही दिले. पण आतापर्यंत त्यांच्या मानधनावर निर्णय झालेला नाही. सल्लागार म्हणून रोकडे यांना काय करायचे आहे, याची जबाबदारी नंतर निश्चित होईल तसेच मानधन व अन्य सुविधांची माहिती नंतर देण्यात येईल, असे कंपनीने पत्रात म्हटले आहे. राज्यात एखाद्या सरकारी कंपनीत या प्रकारे कुणाला जबाबदारी देण्याचे हे प्रकरण असेल.

दुसरीकडे लोड डिस्पॅच सेंटरमध्ये सल्लागार म्हणून नियुक्त केलेले पेंटय्या पोलांगनी यांना दररोज २५ हजार रुपये देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यांना दैनिक भत्त्यावर एक वर्षासाठी नियुक्त केले आहे. चहा, नाश्ता, वाहन आदींचा खर्च कंपनी करेल आणि विमानाने येण्या-जाण्याची सुविधाही मिळेल, असे कंपनीने पत्रात म्हटले आहे.

नियमानुसार नियुक्ती : ऊर्जा सचिव

राज्याचे ऊर्जा सचिव व महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे म्हणाले, या नियुक्त्या नियमानुसार झाल्या आहेत. पेंटय्या पोलांगनी यांचे लोड डिस्पॅच क्षेत्रात देशातच नव्हे तर जगात मोठे नाव आहे. ते कंपनीशी जुळले आहेत, ही मोठी गोष्ट आहे. दुसरे सल्लागार दीपक रोकडे संदर्भात म्हणाले, ते कंपनीचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता आहेत. दोघांची तुलनाच होऊ शकत नाही.

नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्या : पहाडे

महाराष्ट्र वीज कामगार संघाचे महामंत्री शंकर पहाडे यांनी या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याची मागणी करून महापारेषणच्या व्यवस्थापकीय संचालकाला पत्र लिहिले आहे. एक वर्षासाठी झालेल्या या नियुक्त्या नियमानुसार झालेल्या नाहीत. महापारेषणमध्ये प्रशिक्षित अधिकारी आहेत. ते योग्यरीत्या काम करीत आहेत. त्यामुळे सल्लागारांची उपयोगिता खरचं आहे का? आर्थिक संकटात फसलेल्या कंपनीने खर्च वाढविणे योग्य नाही.

टॅग्स :mahavitaranमहावितरण