शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसाच्या बंदनंतर उसळली तुफान गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने उमरेड येथे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बाजारपेठ बंदसाठी घोषित केले आहेत. ...

उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने उमरेड येथे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बाजारपेठ बंदसाठी घोषित केले आहेत. त्यानंतर लागलीच सोमवारी उमरेडच्या आठवडी बाजाराचा दिवस असतो. दोन दिवसाच्या बंदनंतर सोमवारी सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत इतवारी मुख्य बाजार तसेच लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील भाजीबाजारात तुफान गर्दी उसळली होती. काही जणांनी केवळ दंडात्मक कारवाईच्या भीतीने मास्क घातले होते. असंख्य नागरिकांनी ‘मास्क’ला हनुवटीवरच ठेवणे पसंत केले. काही नागरिकांनी मास्क घातलेच नव्हते. ठराविक अंतराच्या नियमाला तर धाब्यावरच बसविल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून आले.

आठवडी बाजारात उमरेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून ते भिवापूर आणि कुही तालुक्यातीलही लगतच्या गावांमधील हजारो नागरिक येत असतात. नागपूर, कामठी, मौदा आदी ठिकाणांहून ठोक व्यापारीही याठिकाणी येत असतात. या कारणामुळे सोमवारी हजारो नागरिकांची गर्दी छोट्याशा इतवारी परिसरात दिसून आली. तालुका व्यवस्थापन समितीने यावर गंभीरतेने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मागील काही दिवसापासून उमरेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चारचौघात वावरताना नागरिक अजूनही गंभीर दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन दिवसाच्या बंदमुळे सोमवारसह अन्य दिवशी नागरिकांची चांगलीच गर्दी उसळते. यामुळे शनिवार आणि रविवार बंदच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

नियमावली कठोर करा

आता कुठे व्यवसायाला गती येत होती, अशातच दोन दिवसाच्या बंदमुळे छोट्या व्यावसायिकांसह अनेकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असाच कटू अनुभव आम्हास येत असून आर्थिक फटका बसत असल्याच्या प्रतिक्रिया अक्षय खानोरकर, सतीश चौधरी, प्रशांत गाडेकर, गिरीश लेंडे, क्षितिज खानोरकर, सचिन कुहीकर, मनोज सदावर्ती, राम आदमने, मुकेश अग्रवाल, अशोक लांजेवार, नितीन डुंभरे, सुमित गजभिये आदींनी व्यक्त केल्या. दोन दिवसाचा व्यापार बंदचा प्रकार बंद करण्यात यावा. वेळेत काही बदल करावयाचा असल्यास तोसुद्धा करण्यात यावा. नियमावली अधिक कठोर करावी, अशीही मागणी व्यक्त होत आहे.

-----

यात डोके कुणाचे?

सोमवारी आठवडी बाजार गावतलावानजीक जुन्या बैलबाजारात भरत होता. अशातच दोन आठवड्यापासून अतिशय अरुंद असलेल्या इतवारी मुख्य भाजीबाजारात हा बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. जुन्या बैलबाजारनजीक सर्व सुविधांयुक्त भव्य परिसरात आठवडी बाजार भरतो. असे असताना अचानकपणे त्या परिसरातील बाजार बंद करून इतवारी मुख्य बाजारात बाजार भरविण्याचा निर्णय घेतला कुणी, असा सवाल विचारला जात आहे.