शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

मोहलीला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:30 IST

धानोरा तालुक्यातील मोहली गावाला २ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला. वादळानंतर पावसाला सुरूवात झाली. वादळाने अनेकांच्या घरांवरील छत उडून गेले. रांगीपासून सात किमी अंतरावर धानोरा मार्गावर मोहली गाव आहे.

ठळक मुद्देछत उडाले : अवकाळी पावसाने नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : धानोरा तालुक्यातील मोहली गावाला २ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला. वादळानंतर पावसाला सुरूवात झाली. वादळाने अनेकांच्या घरांवरील छत उडून गेले.रांगीपासून सात किमी अंतरावर धानोरा मार्गावर मोहली गाव आहे. वादळ एवढे प्रचंड होते की, गावातील वीज खांब वाकले. त्यामुळे वीज तारा तुटल्या. अनेकांच्या घरांवरील टिनाचे छप्पर, कवेलु उडून गेले. नामदेव गावडे यांच्या घरावरील टिनाचे २४ नग, सिमेंटचे चार पत्रे उडून गेले. छत उडाल्याने पावसाचे पाणी घरात पडले. घरात साठविलेले धान्य खराब झाले. गावडे यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. यादव जयराव हुर्रा यांच्या घरा शेजारी असलेले विद्युत खांब घरावर पडले. यामध्ये जवळपास सहा हजार रुपयांचे नुकसान झाले. रवींद्र गणपत तिरंगम यांच्या घराची पडझड झाली. नुकसानीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सरपंच भागरथाबाई गावडे, उषा नरचुलवार, पोलीस पाटील प्रकाश मुनघाटे, रमेश मेश्राम, सुशीला गावडे, नामदेव गावंडे, यादव हुर्रा, रवींद्र तिरंगम यांनी केली आहे.

टॅग्स :weatherहवामान