शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाका लुटणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 02:47 IST

सावनेर - नागपूर महामार्गावर पाटणसावंगी शिवारात असलेल्या टोल नाक्याच्या केबिनमधून चौघांनी साडेनऊ लाख रुपये लुटून नेल्याची घटना

सुपरवायझर निघाला सूत्रधार : ८ लाख १६ हजारांची रोख जप्तलोकमत न्यूज नेटवर्कपाटणसावंगी : सावनेर - नागपूर महामार्गावर पाटणसावंगी शिवारात असलेल्या टोल नाक्याच्या केबिनमधून चौघांनी साडेनऊ लाख रुपये लुटून नेल्याची घटना बुधवारी (दि. १९) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली होती. या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपीसह अन्य तिघांना गुरुवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ८ लाख १६ हजार ६४० रुपये रोख जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, या टोलनाक्यावर सुपरवायजर म्हणून काम करणाराच या लुटमारीचा मुख्य सूत्रधार निघाला.पराग ऊर्फ पिंटू डोमन राऊत (रा. वॉर्ड क्रमांक - ३, महादुला, कोराडी, ता. कामठी), मनोज किसन मानकर (२७, रा. वॉर्ड क्रमांक - २, हनुमान मंदिराजवळ, सुरादेवी, ता. कामठी), अनुभव कुर्वे, केटीपीएस कॉलनी, कोराडी, ता. कामठी व लोकेश इंगळे रा. धरमपेठ, नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चौघेही मित्र असून, पराग राऊत हा पाटणसावंगी शिवारातील टोल नाक्यावर सुपरवायजर म्हणून नोकरी करायचा. पराग त्याच्या तीन सहकाऱ्यांसह मोटरसायकलने टोलनाक्यावर हिशेबाची रक्कम मागण्यासाठी गेला होता. मात्र, कॅशियर संतोष रेडे यांनी त्याला रक्कम देण्यास नकार दिला.परिणामी, पराग व त्याच्या साथीदारांनी संतोष रेडे यांच्यासोबत धक्काबुक्की केली आणि केबिनमधील कपाटाचे कुलूप लोखंडी रॉडने तोडले. शिवाय, आत ठेवलेले नोटांचे बंडल बॅगमध्ये टाकून चौघांनीही लगेच नाक्यावरून पळ काढला. या प्रकरणी रेडे यांनी गुरुवारी दुपारी सावनेर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार नोंदविली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच या घटनेच्या तपासाला सुरुवात केली. त्यातच पराग आणि मनोजला सुरुवातीला आणि अनुभव व लोकेशला नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून त्यांनी चोरून नेलेले ८ लाख १६ हजार ६४० रुपयेही जप्त केले. ही कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, सहायक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, सूरज परमार, नीलेश बर्वे, प्रणयसिंग बनाफर यांच्या पथकाने पार पाडली.२४ तासांच्या आत छडाविशेष म्हणजे, ही घटना बुधवारी (दि. १९) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी संतोष रेडे यांनी या घटनेची तक्रार गुरुवारी दुपारी नोंदविली. चोरांनी साडेनऊ लाख रुपये चोरून नेल्याचेही रेडे यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्यामुळे सावनेर पोलिसांनी भादंवि ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेनेही या घटनेचा समांतर तपास सुरू केला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परागला गुरुवारी (दि. २०) रात्री अर्थात २४ तासांच्या आत कोराडी परिसरात अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे लगेच मनोज, अनुभव आणि लोकेशलाही अटक केली. आरोपींना पोलीस कोठडीसावनेर पोलिसांनी चारही आरोपींना शुक्रवारी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षांकडील बाजू ऐकून घेत आरोपींना सोमवारपर्यंत (दि. २४) पोलीस कोठडी सुनावली. आरोपींनी या टोलनाक्यावर येण्यासाठी चारचाकी वाहन वापरले होते, अशी माहिती नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांनी दिली. पोलिसांनी सदर वाहन अद्यापही जप्त केले नाही. आरोपी नाक्यावर शस्त्राविना लुटमार करण्यासाठी आले होते.