शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुकाणू कमिटीचा ‘अन्नत्याग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 9:33 PM

शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू कमिटीच्या वतीने सोमावरी जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे प्रतिकात्मक गळफास लावून शासनाच्या विरोधात नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह १९ मार्च १९८६ रोजी सेवाग्राम येथे आत्महत्या केली. या घटनेला सोमवारी ३२ वर्षे पूर्ण झाली. दररम्यानच्या कालावधीत राज्यातील चार लाख शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या. आजही शेतकऱ्याच्या समस्या सुटलेल्या नाही. शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू कमिटीच्या वतीने सोमावरी जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रतिकात्मक गळफास लावून शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्यावा, शेतीमालाच्या हमी भावाकरिता मूल्य स्थिरीकरण कोषाची तरतूद करावी, दुधाला वाढीव भाव मिळावा, बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्याना तातडीने मदत द्यावी. शेतकऱ्याना वीज बिल माफ करावे. आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. ज्या व्यवस्थेने शेतकऱ्याना आत्महत्या करण्याची वेळ आणली, त्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले. आता सरकार जागे हाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याना आदरांजली वाहण्यात आली.आंदोलनात शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी सुकाणू कमिटीचे विजयकु मार शिंदे, रविशंकर मांडवकर, मिलिंद महादेवकर, किशोर चोपडे, उत्तम सुळके, स्वप्निल साखरे, निलिकेश कोल्हे, अजय तागडे, रोशन काकडे, जय जवान जय किसान संघटनेचे अरुण लाटकर, किसान सभेचे संजय रणदिवे, जलीम शेख, वसंत मुंडले, ॠषी सहारे, नत्थू परतेती, गंगाराम खेडकर, किसान सभेचे ए.के.घोष, बंडू मेश्राम, विजय बाभुळकर, राजेंद्र गंगोत्री, जनसंपर्क मंचचे जेबुन्निसा शेख, विकास भिसीकर, बंडू वैद्य, बंडू शिंदे, विलास तुळशीकर, राजू वैद्य यांच्यासह शेतकऱ्याचा समावेश होता.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन