शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक, मानसिक, सामाजिक स्तरावर अ‍ॅक्टीव्ह रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:26 IST

वयोमान वाढले आहे. आज व्यक्ती ७० आणि त्याहून जास्त वर्षे जगत आहे. यामुळे शरीरातील महत्त्वाचा अवयव मेंदूच्या आरोग्याची जबाबदारी वाढली आहे.

ठळक मुद्देशैलेश पानगावकर यांचे आवाहन : जागतिक अल्झायमर दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयोमान वाढले आहे. आज व्यक्ती ७० आणि त्याहून जास्त वर्षे जगत आहे. यामुळे शरीरातील महत्त्वाचा अवयव मेंदूच्या आरोग्याची जबाबदारी वाढली आहे. ‘अल्झायमर’ला दूर ठेवायचे असेल तर शारीरिक, मानसिक व सामाजिक स्तरावर ‘अ‍ॅक्टीव्ह’ राहायला हवे. योग्य आहार व नियमित व्यायामाकडे लक्ष द्यायला हवे, असे आवाहन मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर यांनी येथे केले.सायकॅट्रीक सोसायटी नागपूरच्यावतीने रविवारी शंकरनगर येथील साई सभागृहात जागतिक अल्झायमर दिवस साजरा करण्यात आला. ‘वृद्धावस्थेतील समस्या’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पानगावकर म्हणाले, अल्झायमर डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात रुग्णाची स्मरणशक्ती, विचार क्षमता, वागण्याची पद्धत, आकलन, व्यक्तिमत्त्व आणि आजूबाजूच्या परिसरातील माहिती जाणून घेण्याची क्षमता लोप पावत जाते. त्यामुळे जेवण, गाडी चालवणे, कॉम्प्युटरवर काम करण्यासारख्या साध्या गोष्टीही जमत नाहीत. या सर्व कामासाठी आवश्यक असलेल्या मेंदूतील पेशी (न्यूरॉन्स) हळूहळू लोप पावतात. त्यामुळे मेंदू आकुंचन पावतो. या आजाराची लक्षणे दिसण्याआधी बºयाच वर्षांपासून या पेशी काम करेनाशा झालेल्या असतात. मात्र महत्त्वाच्या कामासाठीच्या भागातील पेशींमध्ये लक्षणीय कपात झाल्यावरच लक्षणे दिसू लागतात. या आजारावर कोणताही उपाय नाही. आजार पहिल्या टप्प्यात असताना औषधांनी आजाराचा वेग कमी करता येतो. औषधांशिवाय कुटुंबीयांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो, असेही ते म्हणाले.कार्यक्रमात डॉ. नेहा सालनकर, डॉ. दीपिका सिंग, अ‍ॅड. करण सचदेवा, डॉ. रेणुका मार्इंदे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पवन अडतिया, डॉ. सागर चिद्दरवार, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे यांनी परिश्रम घेतले.डॉ. पानगावकर म्हणाले, अयोग्य जीवनशैलीमुळे पन्नाशीत अल्झायमर वाढत आहे. हे वय धावपळीचे असल्याने स्वत:कडे दुर्लक्ष होते. विशेषत: ज्यांना मधुमेह व उच्चरक्तदाब आहे त्यांचे यावर नियंत्रण राहत नाही. औषध नियमित घेत नाही, व्यायाम करीत नाही, सतत तणावात राहत असल्याने मेंदूच्या पेशी नष्ट होतात. यामुळे योग्य जीवनशैली आत्मसात करणे अतिशय महत्त्वाचे आहे.रोखथाम महत्त्वाचीडॉ. पानगांवकर म्हणाले, अल्झायमरवर कोणताही प्रतिबंधात्मक उपाय सापडलेला नाही. मात्र निरोगी राहणे, नियमित व्यायाम, मेंदूला चालना देणारे प्रकार, योग्य आहार, यामुळे अल्झायमर आजार पुढे ढकलला जाऊ शकतो. अल्झायमरविषयी जनजागृती केल्यास या आजाराचे लवकर निदान होऊन रुग्णाला अधिक योग्य आयुष्य जगण्यासाठी मदत होऊ शकते.योग्य आहार घ्याभारतीय आहार उत्कृष्ट आहे. परंतु वयासोबत दात गळून पडत असल्याने चावून खाण्याचे पदार्थ या वयात कमी पडतात. यामुळे या वयात आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. विशेषत: उकडलेल्या भाज्या, व्हिटॅमिनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. योग्य आहारासोबतच कोवळं उन्ह अंगावर पडू द्या, असेही डॉ. पानगांवकर म्हणाले,