शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये एम्सच्या बांधकामाला सुरुवात

By admin | Updated: July 16, 2016 03:08 IST

मिहानमधील १५० एकरच्या जागेचे केंद्र शासनाच्या आरोग्य व कुुटुंब कल्याण मंत्रालयाकडे हस्तांतरण होताच

वीज, चौपदरी रस्त्यासाठी १२ कोटीची मंजुरी नागपूर : मिहानमधील १५० एकरच्या जागेचे केंद्र शासनाच्या आरोग्य व कुुटुंब कल्याण मंत्रालयाकडे हस्तांतरण होताच आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स)विकासाला गती मिळाली आहे. ‘हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटन्सी कॉर्पाेरेशन लिमिटेड’ने (एचएससीसी) संरक्षण भिंतीच्या कार्याला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, प्रस्तावित जागेवर वीज, पाणी व चौपदरी रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यासाठी नुकतेच १२ कोटी रुपयांना मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. मिहान प्रकल्पाच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील सेक्टर २० मधील १५० एकर जमीन १.५ चटई क्षेत्रनिर्देशांकासह ‘एम्स’ स्थापन करण्याकरिता प्रस्तावित होती. ११ मार्च २०१६ रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत केंद्र शासनाच्या आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयास नाममात्र एक रुपया भाडेपट्ट्याने ९९ वर्षांकरिता ही जागा हस्तांतरित करण्यात आली. देशपातळीवर ‘एम्स’चे बांधकाम ‘आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय’अंतर्गत काम करणारी ‘एचएससीसी’ कंपनी करते. जागा हस्तांतरित होताच या कंपनीने ३० एप्रिलपासून एम्सच्या संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात केली आहे. प्रस्तावित जागेवर वीज, पाणी व चौपदरी रस्ता या पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यानुसार १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या निधीतून सुमारे आठ कोटी रुपये दोन पदरी असलेल्या रस्त्याचे चौपदरी करण्यासाठी, खर्च केले जाणार आहे. तीन कोटी रुपयांमधून प्रस्तावित जागेवर असलेले उच्चदाबाचे विद्युत टॉवर हटविण्यात येईल, तर उर्वरित निधीतून जुनी संरक्षण भिंत पाडून त्या जागी आठ फूट उंच भिंत बांधण्यात येणार आहे. ‘एम्स’च्या विकासासंदर्भात नागपुरात ३ जुलै रोजी बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निर्देशामुळेच हा निधी मिळाल्याचेही बोलले जात आहे. (प्रतिनिधी)