शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस येथील कामे १५ आॅगस्टपूर्वी सुरू करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 9:03 PM

पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या बृहत् आराखड्यानुसार शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन  पॅलेस, रामटेक तसेच नगरधन येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधांसंदर्भातील सविस्तर आराखडा तयार करून १५ आॅगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : कोराडी, आदासा, ताजबागचाही आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या बृहत् आराखड्यानुसार शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन  पॅलेस, रामटेक तसेच नगरधन येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधांसंदर्भातील सविस्तर आराखडा तयार करून १५ आॅगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात बचतभवन सभागृहात पर्यटन विकासासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित केली होती त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, नितीन राऊत, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, चरणसिंग ठाकूर उपस्थित होते.डॅÑगन पॅलेस तसेच दीक्षाभूमी या स्मारक समितीकडून मालकी हक्काबाबतची तसेच १० टक्के निधी बाबतची अट शासनाने शिथील करावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली. या संदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी दिली. नागलोक आणि बुध्दभूमीसाठी प्रत्येकी १० कोटी रुपये, कुवारा भिवसेन येथे १५ कोटी रुपये, तसेच दीक्षाभूमी येथील मंजूर झाल्या व्यतिरिक्त उर्वरित कामासाठी २०० कोटी रुपये, ड्रॅगन पॅलेससाठी २०० कोटी रुपये आणि महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थांन कोराडीसाठी अतिरिक्त ६५ कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. शांतिवन, चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयाची संपूर्ण कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी