सलून दुकाने सुरू करा, अन्यथा मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:33+5:302021-04-11T04:08:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : शासनाच्या निर्देशाचे पालन करीत संचारबंदीदरम्यान आम्ही सलून दुकाने बंद ठेवली हाेती. लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका ...

सलून दुकाने सुरू करा, अन्यथा मानधन द्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : शासनाच्या निर्देशाचे पालन करीत संचारबंदीदरम्यान आम्ही सलून दुकाने बंद ठेवली हाेती. लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका सलून दुकानदारांना बसला. यामुळे नाभिक बांधवांना आर्थिक समस्येला सामाेरे जावे लागले. यातून कसे तरी सावरलाे असताना आता पुन्हा सलून दुकाने बंदचा निर्णय घेण्यात आला. सलून दुकाने बंद असल्याने नाभिक बांधवांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आमची सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या, अन्यथा मासिक मानधन सुरू करा, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न. प. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले व ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांच्यामार्फत नाभिक एकता मंचने दिले आहे.
लाॅकडाऊनदरम्यान समाजबांधवांच्या आत्महत्या झाल्या. त्यांच्या कुटुंबीयांना अद्यापही कुठलीही मदत मिळाली नाही. अनेक कुटुंबे संकटातून सावरली नाहीत. असे असताना पुन्हा लाॅकडाऊनचा भार सलून व्यवसायिकांवर लादला आहे. ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत कडक लाॅकडाऊनचे निर्देश देऊन शासनाने आमची राेजीराेटी हिरावली आहे. अशावेळी मुलाबाळांसह व कुटुंबांच्या भरणपाेषणाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. विजेचे बिल, दुकान भाडे, घरभाडे, आराेग्य समस्या आदींसाठी नाभिक बांधवांना माेठी आर्थिक समस्या भेडसावत आहे. त्यामुळे शासनाने सलून दुकाने सुरू करण्यासाठी तात्काळ परवानगी द्यावी, अन्यथा ११ एप्रिलपासून सलून सुरू करून शासनाविराेधात निषेध आंदाेलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मंचचे अध्यक्ष राजेश मानकर, वसंत घडीनकर, विलास वाटकर, रवींद्र खैरकर, मनोज राजूरकर, सतीश नंदनकर, विलास अतकरे, वासुदेव कुक्कडकर, सुनील बोरकर, विजय वलोकर, राजेंद्र चौधरी, कुणाल मोरस्कर, रमेश वाटकर, अर्जुन वालोकर, राजेश चांदेकर, राजेश मानकर, मनोज राजूरकर, मनोहर मांडवकर, शंकर वलोकर, अर्जुन वलोकर, सुनील बोरकर, विनोद चौधरी, दिवाकर निंबूळकर, अमोल तळखंडे, हरीश पारधी, मनोज राजूरकर, राजेश चांदेकर, सतीश नांदनकर, विलास अतकरे, राहुल पोपटे, मनोहर उरकुडे, लक्ष्मण शर्मा, महेश राजूरकर, अमोल तळखंडे आदी उपस्थित होते.