शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. कर्मचाऱ्यांचे ‘स्टाफ’ सांगणे बंद

By admin | Updated: April 9, 2016 03:22 IST

एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ५० कि.मी.पर्यंतचा प्रवास मोफत करण्यास मुभा देण्यात आली होती.

कर्मचाऱ्यांना लागणार प्रवास भाडे : प्रवाशांना मोजावा लागणार अतिरिक्त एक रुपयाकैलास निघोट देवलापारएस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ५० कि.मी.पर्यंतचा प्रवास मोफत करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे सदर कर्मचारी वाहकाला कुठे जावयाचे आहे, हे सांगण्याऐवजी केवळ ‘स्टाफ’ म्हणायचे. महामंडळाने ही सवलत मोडित काढण्याचा निर्णय घेतल्याने एस.टी. कर्मचाऱ्यांना या प्रवासासाठी प्रवासभाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे ‘स्टाफ’ सांगणे बंद होणार आहे. शिवाय, प्रत्येक प्रवाशाला त्याच्या प्रवासभाड्याव्यतिरिक्त एक रुपया जास्तीचा मोजावा लागणार आहे. या एक रुपयाचे त्यांना वेगळे तिकीटही दिले जाणार आहे. या निर्णयाचा महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी नुकताच आदेश जारी केला असून, हा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाला लागू राहणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. विना तिकीट प्रवास करणे, प्रवासाची विहीत मोफत पास, कार्यालयीन कामानिमित्त देण्यात येणाऱ्या अधिकृत पासेस, कर्मचाऱ्यांचे प्रवाशांसोबत असौजन्यपूर्ण वर्तन यासह अन्य बाबींमुळे महामंडळाला उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे. त्यातच कर्मचाऱ्याचा प्रवाशांशी होणाऱ्या वादामुळे महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे ६ ते १२ एप्रिल या काळात विशेष मार्ग तपासणी केली जाणार असून, त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. दुसरीकडे, राज्य परिवहन महामंडळात अनेक कर्मचारी कमी वेतनावर कित्येक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यासाठी आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी आश्वासने देऊनही त्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली नाही, अशा प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. सोबत प्रत्येक प्रवाशाकडून प्रवासभाड्याव्यतिरिक्त एक रुपया अधिक घेतला जाणार आहे. या एक रुपयाचे त्यांना वेगळे तिकीट दिले जाणार आहे. आधीच प्रवासभाडे वाढविण्यात आले. यासाठी प्रसंगी डिझेल दरवाढीचे कारण पुढे करण्यात आले. डिझेलचे दर कमी होऊनही तिकिटांचा दर कायम ठेवण्यात आला. ग्रामीण भागात बसफेऱ्यांची अनियमितता वाढली आहे. त्यातच प्रवाशांना एक रुपया अतिरिक्त मोजावा लागणार असल्याने प्रवाशांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. प्रवाशांसाठी हा निर्णय नवीन असल्याने बहुतांश प्रवासी वाहकांसोबत वाद घालत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. महिन्याकाठी २० कोटी रुपये जमाएस.टी. महामंडळाच्या बसेसनी रोज राज्यभर किमान ६५ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांकडून एक रुपया वसूल केल्यास महामंडळाकडे रोज ६५ लाख रुपये गोळा होणार आहेत. महिन्याकाठी ही रक्कम २० कोटी रुपयांच्या घरात जाते. ही रक्कम महामंडळाला मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या एक रुपयातून प्रवाशांना विम्याचा कोणता लाभ मिळणार आहे, हेदेखील स्पष्ट करण्यात आले नाही. हा विमा अपघाती आहे की अन्य आहे, त्या विम्याचा लाभ मिळविण्यासाठी त्या प्रवाशाला एक रुपयाचे तिकीट जपून ठेवावे लागगणार की नाही, यासह अन्य महत्त्वाच्या बाबी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्या नाहीत.एक प्रवासी; दोन तिकिटेराज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांच्या नवीन आदेशान्वये प्रत्येक प्रवाशाला आता दोन तिकिटे मिळणार आहेत. यातील एक तिकीट त्याच्या प्रवासभाड्याचे तर दुसरे तिकीट त्याच्याकडून घेतलेल्या एक रुपयाचे असणार आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा इतर सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्यांनाही एक रुपया द्यावा लागणार आहे. हा एक रुपया फक्त एका वेळच्या प्रवासाचा असणार आहे. हा एक रुपया त्या प्रवाशाच्या विम्यापोटी घेतला जात असल्याची माहिती वाहकांकडून प्रवाशांना दिली जात आहे. या एक रुपयात त्या प्रवाशाचा १० लाख रुपयांचा विमा असणार आहे, असेही वाहकांनी सांगितले.