देवाधिदेव महादेव एसटी महांमडळावर प्रसन्न; यात्रा स्पेशलमुळे लाखोंची कमाई 

By नरेश डोंगरे | Published: March 12, 2024 10:47 PM2024-03-12T22:47:01+5:302024-03-12T22:47:19+5:30

पचमढीला एसटीने १२,५५३, तर अंभोरा यात्रेला १३,४३४ भाविकांचा प्रवास.

ST Mahamandal Earning lakhs due to Yatra Special | देवाधिदेव महादेव एसटी महांमडळावर प्रसन्न; यात्रा स्पेशलमुळे लाखोंची कमाई 

देवाधिदेव महादेव एसटी महांमडळावर प्रसन्न; यात्रा स्पेशलमुळे लाखोंची कमाई 

नागपूर : महाशिवरात्री पवित्र पर्वावर सुप्रसिद्ध शिवालयांच्या ठिकाणी भाविकांना दर्शन घडवून आणणाऱ्या लालपरीला अर्थात एसटी महामंडळावर देवाधिदेव महादेव चांगलाच प्रसन्न झाला. त्याने एसटीच्या तिजोरीत ५४ लाखांपेक्षा जास्तची गंगाजळी ओतली.

ठिकठिकाणच्या शिवतिर्थांवर जाण्यासाठी वर्षभर भाविकांची लगबग सुरू असते. त्यात महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक शिवालयांच्या ठिकाणी भव्य जत्रा भरते. त्यामुळे महाशिवरात्रीला शिवालयात दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणचे भाविक प्रचंड गर्दी करतात. मध्य प्रदेशातील पचमढी आणि अंभोरा या ठिकाणीही हर हर महादेवचा गजर करीत लाखो भाविकांची मांदियाळी जमते. दरवर्षीचा हा अनुभव ध्यानात घेऊन एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी यावर्षी आधीपासूनच नियोजन केले होते. पचमढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना १ मार्चपासून ९ मार्चपर्यंत तर अंभोरा येथील भाविकांसाठी ८ आणि ९ मार्च अशा दोन दिवसांच्या यात्रा स्पेशल बसचे नियोजन करण्यात आले होते. त्याचा एसटी मंडळाला लाखमोलाचा फायदा झाला. पचमढी यात्रेसाठी नागपूरहून एसटीच्या ३०४ फेऱ्या झाल्या. त्यातून महामंडळाला ४६ लाख, १४ हजार, ९०१ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

त्याच प्रमाणे अंभोरा यात्रेसाठी एसटीने ८ आणि ९ मार्च या दोन दिवसांत ४३० यात्रा स्पेशल बसफेऱ्या चालविल्या. त्यातून एसटी महामंडळाला ८ लाख, ५५ हजार, ८४३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
 
पचमढी यात्रा
बस फेऱ्या कि.मी. उत्पन्न प्रवासी
यावर्षी - ३०४ ८०, ८६४ ४६, १४, ९०१ १२, ५५३
गेल्या वर्षी - २५० ६५,५३२ ४१,२५,४४१ १८,८६३
 

अंभोरा यात्रा

बस फेऱ्या            कि.मी. उत्पन्न प्रवासी

यावर्षी ४३० २१,४७५ ८,५५८,४३ १३, ४३४

गेल्या वर्षी -२९६ १८,८५५ ७,५८,८०५ १३,८२७

Web Title: ST Mahamandal Earning lakhs due to Yatra Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर