शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीसाठी विशेष अनुदान

By admin | Updated: January 8, 2015 01:24 IST

१५ वर्षापूर्वी शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकाळात शहरातील विकास कामासाठी राज्य सरकारकडून विशेष अनुदान मिळत होते. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने ते बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

महापौर प्रवीण दटके यांची माहिती : मार्चला पहिला टप्पानागपूर : १५ वर्षापूर्वी शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकाळात शहरातील विकास कामासाठी राज्य सरकारकडून विशेष अनुदान मिळत होते. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने ते बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता ते पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती महापौर प्र्रवीण दटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार अनिल सोले, सुधाकर कोहळे , स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, सभापती गिरीश देशमुख, रमेश सिंगारे आदी उपस्थित होते.विशेष अनुदान मार्च २०१५पासून सुरु होणार आहे. शहर विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे २०० कोटींची मागणी केली होती. मात्र त्यांनी ३००कोटी देण्याचे आश्वासन दिले. स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलाचा काही भाग मनपाला मिळणे अपेक्षित आहे. परंतु मागील काही वर्षात न मिळालेला ५५ कोटींचा निधी मनपाला मिळणार आहे. मलेयिा व फायलेरिया अनुदानाचे १४ कोटी, तसेच अर्थसंकल्पातही नागपूर शहराला पुन्हा निधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जुन्या सिमेंट रस्त्याचे काम महिनाभरात पुन्हा सुरू होईल. शहर विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी आयुक्तांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक घेण्यात आली. सुरुवातीच्या आराखड्यात सिमेंट रस्त्यांवरील खर्च जादा दर्शविण्यात आला होता. तो कमी करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)१० टक्के निधी मिळणारजेएनएनयूआरएम योजनेंतर्गत शहरात १८ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील ११ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. ७ प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. परंतु केंद्र सरकारने ही योजना बंद क रण्याचा निर्णय घेतला आहे. सुरू असलेल्या प्रकल्पासाठी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. या योजनेचा १० टक्के निधी मिळणार असल्याची माहिती दटके यांनी दिली.नासुप्र बरखास्तीची मागणी कायमअधिकारी येतात व जातात, प्रत्येक आयुक्तांचा राजकीय नेत्यांशी संबंध येतो. श्याम वर्धने नासुप्रवर सभापती म्हणून गेले आहेत. ते मनपाच्या जागांची अधिक काळजी घेतील. शहरातील ७ योजनांच्या माध्यमातून ९०० कोटी जमा केल्या नंतरही नासुप्र मूलभूत सुविधांची कामे करीत नाही. मुख्यमंत्री या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील. नासुप्र बरखास्त करण्याची मागणी आजही कायम असल्याचे त्यांनी सांगितले.