शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया, राहुल गांधी एप्रिलमध्ये नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 03:07 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केल्यानंतर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वी जयंती सोहळा : एप्रिलचा दुसरा आठवडा निश्चितनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केल्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात नागपुरात भव्य समारोपीय सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी किंवा उपाध्यक्ष राहुल गांधी हे उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी प्रदेश काँग्रेसने तयारी चालविली आहे. ९ ते १४ एप्रिल दरम्यानची कुठलीही एक तारीख या सोहळ्यासाठी निश्चित केली जाईल. सोहळा दीक्षाभूमीवर घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा मानस आहे. मात्र, दीक्षाभूमी स्मारक समितीकडून त्याची परवानगी न मिळाल्यास कस्तूरचंद पार्कचा विचार केला जाईल. या सोहळ्याच्या आखणीसाठी दिल्लीत १६ मार्च रोेजी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीनंतर १९ किंवा २० मार्च रोजी नागपुरात प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक होईल. १९ रोजी प्रदेश काँग्रेसची बैठकनागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५वा जयंती सोहळा साजरा करण्यासाठी नागपुरात १९ किंवा २० मार्च रोजी आयोजित काँग्रेसच्या बैठकीला अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी खा. विलास मुत्तेमवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री नारायण राणे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते, विदर्भातील आजी माजी आमदार, खासदार, मंत्री व पदाधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत कार्यक्रमाची अंतिम रूपरेषा निश्चित होईल.राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या शुभारंभप्रसंगी कस्तूरचंद पार्कवर सोनिया गांधी यांच्या सभेला अलोट गर्दी जमली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्व नागपुरातील सभेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त नागपुरात सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमालाही तशीच गर्दी व्हावी, याचे नियोजन काँग्रेसतर्फे केले जात आहे. याबाबत प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा सोहळा नागपुरात होणार असल्याचे सांगत अद्याप तारीख, वेळ व नेमके कोण उपस्थित राहणार, हे निश्चित झाले नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)