शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

सोनालीच्या खुनाचे पडसाद

By admin | Updated: September 13, 2014 02:42 IST

वकिलाने नवविवाहित पत्नीचा हुंड्यासाठी निर्घृण खून केल्याच्या घटनेने उपराजधानीत संतापाचे वातावरण निर्माण केले आहे.

नागपूर : वकिलाने नवविवाहित पत्नीचा हुंड्यासाठी निर्घृण खून केल्याच्या घटनेने उपराजधानीत संतापाचे वातावरण निर्माण केले आहे. विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण रेटून धरण्यासाठी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.लकडगंजमधील क्वेट्टा कॉलनीतील अमोल पांडुरंग बोरकर (वय ३१) याचे १७ जूनला लग्न झाले. सासरच्यांकडून त्याला लग्नात सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंच्या भेटवस्तू मिळाल्या. उच्चशिक्षित पत्नी सोनाली (वय २६) लग्नाच्या काही दिवसानंतरच शिकवणी वर्ग घेऊन महिन्याला मोठी रक्कम अमोलच्या हातात देऊ लागली. मात्र, आरोपीचे समाधान झाले नाही. हुंड्यासाठी हपापलेल्या अमोलला सासरच्या मंडळीकडून कार हवी होती. त्यासाठी सासऱ्याने दोन लाख रुपये द्यावे, अशी त्याची मागणी होती. त्याचसाठी तो नवविवाहित सोनालीचा छळ करू लागला. लग्नाच्या काही दिवसातच माहेरच्यांना पतीचे गाऱ्हाणे ऐकवण्याची हिंमत सोनालीची झाली नाही. तिने एका नातेवाईकाला आपली छळकथा सांगितली. मात्र, ‘माहेरच्यांना हे माहीत झाल्यास,त्यांना मनस्ताप होईल‘, असे म्हणत त्यांना काहीही सांगू नको, अशी विनंतीही केली. त्यामुळे सोनालीची छळकथा अंधारातच राहिली. या पार्श्वभूमीवर, सोनालीने विष घेतल्याचा कांगावा करून अमोलने तिला सेंट्रल एव्हेन्यूवरील खासगी रुग्णालयात दाखल केले. १० सप्टेंबरच्या सकाळी ५.१५ ला सोनालीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्या संशयास्पद मृत्यूची पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. सोनालीच्या मृत्यूचे कारण वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. तिच्या डोक्यावर, शरीरावर आधी बॅट किंवा फळीचे फटके मारले असावे आणि ती बेशुध्दावस्थेत असताना तिच्यावर विषप्रयोग करण्यात आला असावा, असा अहवाल डॉक्टरांनी दिला. सोनालीचा बळी तिच्या पती आणि सासरच्या मंडळीने हुंड्यासाठीच घेतल्याचा निष्कर्ष पुढे आला. त्यामुळे पोलिसांनी सोनालीचा नवरा अमोल, दीर राधेश्याम आणि सासू रेखाबाई पांडुरंग बोरकर या तिघांवर हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्हे दाखल केले. ते सध्या लकडगंज पोलिसांच्या कस्टडीत आहेत. ठाणेदार सत्यनारायण जयस्वाल हे आरोपींची चौकश्ी करीत आहेत. दरम्यान,पोलीस उपायुक्त निर्मलादेवी एस यांनी आज ठाणेदार जयस्वाल यांच्याकडून या गंभीर प्रकरणाची इत्थंभूत माहिती घेतली. (प्रतिनिधी)