शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाविषयीच्या शंकांचे समाधान

By admin | Updated: March 2, 2017 02:33 IST

समृद्धी महामार्ग अर्थात नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे विषयी शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे जाहीर सुनावणीत

जाहीर सुनावणी : १० जिल्हे, २४ तालुके, ३८५ गावे जोडणार नागपूर : समृद्धी महामार्ग अर्थात नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे विषयी शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे जाहीर सुनावणीत समाधान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मंगळवारी हिंगणा तालुक्यातील वडगाव गुजर गावातल्या एका शेतात ही सुनावणी घेतली. नागपूर ते वर्धा या ८९.३५५ किमी अंतराच्या पट्ट्यापर्यंत ही सुनावणी मर्यादित होती. महामंडळाचे अधीक्षक अभियंता यू. जे. दाबे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून महामार्गाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील २१ गावांमधील तर, वर्धा तालुक्यातील ३४ गावांमधील एकूण १५२०.०४ हेक्टर जमीन लागणार असून त्यापैकी ४९.२२ हेक्टर वनजमीन असल्याचे दाबे यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हाधिकारी के. एन. के. राव यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर आवश्यक ती माहिती उपलब्ध होईल अशी माहिती दिली. ७०२ किमी लांबीचा हा महामार्ग १० जिल्हे, २४ तालुके व ३८५ गावांना जोडणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नागपूर प्रवासाचा कालावधी १६ तासांवरून घटून अवघ्या ८ तासांवर येईल. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कृषी विकासाला चालना मिळेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.(प्रतिनिधी)