शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने शेतकऱ्यांना आधार द्यावा

By admin | Updated: January 28, 2016 03:10 IST

ऊन, पाऊस, वारा यांची अजिबात पर्वा न करता समाजाचे पोट भरण्यासाठी शेतीत झटणारा बळीराजाच आज अडचणीत सापडला आहे.

मोहन भागवत : ‘ऋणाधार’तर्फे १०० शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदतनागपूर : ऊन, पाऊस, वारा यांची अजिबात पर्वा न करता समाजाचे पोट भरण्यासाठी शेतीत झटणारा बळीराजाच आज अडचणीत सापडला आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरीच समस्येत असेल तर हे दुर्दैवच आहे. शेतकऱ्यांना केवळ सरकारच मदत करेल या आशेवर न थांबता समाजाने पुढाकार घेऊन त्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे. हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ‘ऋणाधार चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने १०० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याच्या उपक्रमाला मंगळवारी सुरुवात झाली. दक्षिण अंबाझरी मार्गावरील बी. आर. मुंडले सभागृहात आयोजित या कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आपल्या १२१ कोटीच्या देशात शेतकरी अनाथ असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल. समाजाने त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. शहरातील परिवारांनी गावातील एक शेतकरी परिवार निवडावा आणि त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.भागवत यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची ओढाताण पाहून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी शहरातील संवेदनशील व्यक्ती एकत्र आल्या व त्यातूनच ‘ऋणाधार ट्रस्ट’ची स्थापना झाली. या ‘ट्रस्ट’च्या माध्यमातून नागपूर व वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या कुटुंबांना एकरकमी मदत देण्याऐवजी या संस्थेने १०० कुटुंबांना दरमहा चार हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा संकल्प केला. दर महिन्याला या कुटुंबाच्या जनधन योजनेंतर्गत काढलेल्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबांना मदतीच्या ‘अंकुर’ या प्रकल्पाला प्रारंभ झाला व त्यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबीयांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.यावेळी नगरसेवक संदीप जोशी, उद्योजक अरुण लखानी, पराग सराफ, डॉ.प्रमोद गिरी, वृषाली देशपांडे, डॉ.मनोज सिंगरखिया, दयाल मुलचंदानी, दीपा काळे, प्रशांत दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)शेतकरीपुत्रांना देणार कौशल्यपूर्ण शिक्षण‘ट्रस्ट’तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ‘अंकुश’ प्र्रकल्प उभारण्यात येतोय. या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यात येईल. नागपुरात मुलांसाठी वसतिगृहे बांधण्यात येतील. तर शेतकऱ्यांच्या मुलीसांठी त्यांना पूरक असा व्यवसाय, रोजगार उपलब्ध करून देणार येईल. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंब सावरण्याचा प्रयत्न ‘ऋणाधार’ करणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली.