समाज आणि डॉक्टर एकमेकांना पूरक

By Admin | Updated: July 3, 2014 00:56 IST2014-07-03T00:56:58+5:302014-07-03T00:56:58+5:30

डॉक्टरांशिवाय समाज नाही आणि समाजाशिवाय डॉक्टर नाही. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी डॉक्टर डॉक्टरच राहतील. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवेदनशिलता होणे आवश्यक आहे. आरोग्यसेवेत माणुसकीशी

Society and Doctors Supplement Each Other | समाज आणि डॉक्टर एकमेकांना पूरक

समाज आणि डॉक्टर एकमेकांना पूरक

आयएमए : ‘डॉक्टर्स डे’निमित्त वरिष्ठ डॉक्टरांचा सत्कार
नागपूर : डॉक्टरांशिवाय समाज नाही आणि समाजाशिवाय डॉक्टर नाही. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी डॉक्टर डॉक्टरच राहतील. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवेदनशिलता होणे आवश्यक आहे. आरोग्यसेवेत माणुसकीशी बांधिलकी मानून रु ग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा आदर समाज करतो, असे प्रतिपादन कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने (आयएमए) मंगळवारी आयोजित ‘डॉक्टर्स डे’निमित्त डॉक्टरांच्या गुणवंत मुलांचा आणि वरिष्ठ डॉक्टरांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कुश झुनझुनवाला आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचे उपकुलपती डॉ. विनायक देशपांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वरिष्ठ चिकित्सक डॉ. प्रभा बाला, डॉ. कांचा सेठ, डॉ. एस. डब्ल्यू. कुलकर्णी, डॉ. बी. एम. सहाय, डॉ. जी. के. सरोदे आणि मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांचा शाल-श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. मिश्रा म्हणाले, आजही रुग्ण ईश्वराएवढाच रुग्णांवर विश्वास ठेवतात. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी डॉक्टरांनी आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य पार पाडावे. सत्काराला उत्तर देताना डॉ. वाकोडे म्हणाले, डॉक्टर होण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते, नंतर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हा सत्कार व्यक्तीचा नसून त्यांच्या कार्याचा आहे, असेही ते म्हणाले. डॉ. देशपांडे म्हणाले, रुग्णासाठी डॉक्टर ईश्वरच असतो. परंतु डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे आणि मानवी प्रयत्नांना मर्यादा आहे.
यामुळे प्रत्येक वेळी सांगितल्यानुसारच होऊन आजारमुक्ती, मरणमुक्ती मिळेल असं नसतं. प्रत्येक डॉक्टर रुग्णाला वाचविण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत असतो. यावेळी डॉ. देशपांडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडून भविष्यातील कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Society and Doctors Supplement Each Other