शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांमुळेच सामाजिक व आर्थिक प्रगती

By admin | Updated: April 25, 2016 02:50 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली असून, भारतीयांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे प्रतिपादन डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.

स्वतंत्र मजदूर युनियनचे संमेलन : डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंतीनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली असून, भारतीयांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे प्रतिपादन डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय कामगार संमेलन बैद्यनाथ चौक येथील अजंता हॉलमध्ये रविवारी पार पडले. अध्यक्षस्थानी डॉ. सुखदेव थोरात, स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. डी.बी. वानकर, नागपूरचे महासचिव जे.एस. पाटील, विनायक निकाळे, दोन्ता प्रशांत उपस्थित होते. थोरात म्हणाले, संविधानाच्या माध्यमातून समानता, स्वतंत्रता आणि न्यायाचा अधिकार तसेच शैक्षणिक आणि सेवांमध्ये आरक्षणाची तरतूद झाली. त्याच्या परिणामस्वरूपात भारतात ८० ते ९० लाख अनुसूचित जाती-जमातीचे कर्मचारी संघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक आणि आर्थिक उन्नती बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग आणि बलिदानामुळे प्राप्त झाली. डॉ. आंबेडकरांनी १२-१३ फेब्रुवारी १९३८ रोजी मनमाड (महाराष्ट्र ) येथे झालेल्या दलित रेल्वे कामगार परिषदेत ट्रेड युनियनवर भाष्य केले होते. त्यांच्या विचारामुळेच राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र मजदूर युनियनची स्थापना झाली. यावेळी स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. डी.बी. वानकर, नागपूरचे महासचिव जे.एस. पाटील, विनायक निकाळे, दोन्ता प्रशांत यांनी मार्गदर्शन करताना अनुसूचित जाती-जनजाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यक कर्मचाऱ्यांना संघटित करून आंबेडकरी कामगार आंदोलन मजबूत करण्याचे आवाहन केले. पहिल्या सत्रात डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते युनियनच्या माईलस्टोन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक एन.बी. जारोंडे यांनी केले तर डी.एम. खैरे यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.एस. पाटील. अ‍ॅड. मनोज गोरकेला. एम. जगन्नाथन, ए.व्ही. किरण. दिलीप गामील यांनी ‘संविधानिक संरक्षण व न्यायिक भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले.दुसऱ्या सत्रात एस.के. सचदेव यांनी प्रास्ताविक केले. संमेलनात एआयव्हीईएफचे सरचिटणीस ए.व्ही. किरण, एमआरएमव्हीकेएसचे मुख्य संघटक एस.के. हनवते, अध्यक्ष संजय घोडके, आयएलयूचे सीडब्ल्यूसी सदस्य गणेश उके, एमआरएमव्हीकेएस, एनयूझेडचे अध्यक्ष एच.व्ही. ढोके, एसआरबीकेयूचे (रेल्वे) केंद्रीय उपाध्यक्ष सी.एस. जनबदकर, उपाध्यक्ष वा.के. कांबळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)