लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवरात्राच्या सुरुवातीपासूनच विदर्भात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. येत्या २ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी नागपूरसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभात सहभागी अनुयायींच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाचा कस लागणार आहे. रावण दहन आणि दुर्गा प्रतिमेच्या विसर्जनातही अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शनिवारी रात्री विदर्भाच्या बहुतेक जिल्ह्यात बरसलेल्या पावसाने रविवारी शांतता बाळगली. रविवारी येलो अलर्ट असूनही नागपूरमध्ये दिवसभर ढग शांत राहिले. काही अंतराने हलक्या रिमझिम सरी आल्या.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, पुढील ७ दिवसांपर्यंत मान्सून परतण्यास अनुकूल परिस्थिती नाहीच. पश्चिम विदर्भ ते उत्तर मध्य महाराष्ट्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, जे पुढील २४ तासांत दक्षिण-पश्चिमेकडे सरकत हळूहळू कमकुवत होईल.
म्हणून मान्सूनास विलंब
बंगालच्या उपसागर आणि अरब सागरात एकाचवेळी १ ऑक्टोबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे मध्य भारतात मान्सून ढग पुन्हा सक्रिय होतील. सध्या मान्सून परतण्याचे कोणतेही संकेत नाहीत. सध्या भरूच, उज्जैन, झाशी, शाहजहांपूरपर्यंत मान्सूनचे ढग पोहोचले आहेत.
Web Summary : Nagpur and Vidarbha brace for heavy rains on Dussehra. Celebrations and Dhamma Chakra Pravartan Day events may face disruptions. Monsoon's retreat is delayed due to low pressure areas forming in the Bay of Bengal and Arabian Sea, reactivating monsoon clouds over central India.
Web Summary : नागपुर और विदर्भ में दशहरा पर भारी बारिश की आशंका है। उत्सव और धम्म चक्र प्रवर्तन दिवस के कार्यक्रमों में बाधा आ सकती है। बंगाल की खाड़ी और अरब सागर में कम दबाव के क्षेत्र बनने से मानसून की वापसी में देरी हो रही है, जिससे मध्य भारत में मानसून के बादल फिर से सक्रिय हो रहे हैं।